शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
"अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
6
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
7
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
8
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
9
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
10
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
11
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
12
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
13
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
14
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
15
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
16
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
17
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
18
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
19
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
20
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं

धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता; शरद पवारांचं 'ते' विधान अन् चर्चेला उधाण

By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 2:56 PM

नवाब मलिक आणि धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवरून शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; आरोप गंभीर असल्याचं सांगत शरद पवार म्हणतात... सध्याच्या घडीला राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले असताना नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकरणांवर शरद पवार यांनी भाष्य केलं. मात्र दोन्ही मंत्र्यांबद्दल बोलताना पवार यांनी घेतलेली भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. मलिक यांच्या जावयावर आरोप झाले आहेत. मलिक यांच्यावर व्यक्तिगत स्वरुपाचे कोणतेही आरोप नाहीत. त्यांच्या जावयावर झालेल्या आरोपासंबंधांत संबंधित यंत्रणेकडून कारवाई सुरू आहे, असं म्हणत पवार यांनी मलिक यांना अप्रत्यक्षपणे क्लीन चीट दिली.अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...गेल्या २५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात काम करताना मलिक यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाचे आरोप झालेले नाहीत असं म्हणणाऱ्या शरद पवारांनी मुंडेंवरील आरोप मात्र गंभीर स्वरुपाचे असल्याचं म्हटलं. 'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल,' असं पवार म्हणाले. त्यामुळे पक्षाकडून मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट''त्यासाठी सीएमची वाट पाहणार नाही, पक्ष निर्णय घेईल''मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याची मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का, असा प्रश्न पवार यांनी विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू. मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असं उत्तर पवार यांनी दिलं. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेत असताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि आरोपांचं गांभीर्य कमी होणार नाही, या गोष्टी लक्षात घेऊ, असं पवार यांनी सांगितलं.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेnawab malikनवाब मलिक