पटना : बिहारमध्ये जसजसा निकालाला विलंब होऊ लागला आहे तसतसा फासाही पलटू लागला आहे. बिहारमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. आता मात्र, 6 वाजता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राजद सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
बिहारच्या मतमोजणीला रात्री उशीर होणार आहे. कोरोनामुळे मतमोजणी केंद्र वाढविण्यात आली आहेत. यामुळे मध्यरात्रीपर्यंत मोजणी सुरु राहणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतमोजणी सुरु करून 10 तास उलटले तरी अद्याप केवळ 14 जागांचाच निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपा 6 जागांवर जिंकली आहे. एमआयएमने पहिल्यांदाच खाते उघडले आहे. काँग्रेस १, जदयू २, राजद २ आणि व्हीआयपी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान, राजदने भाजपाचा सर्वात मोठ्या पक्षाचा खिताब काही काळासाठी का होईन काढून घेतला आहे. आजतकने दिलेल्या आकडेवारीनुसार एनडीए 123 तर राजद महाआघाडी 113 जागांवर आघाडीवर आहे. तर निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपा 72, राजद 74, जदयू 43, काँग्रेस 20, सीपीआयएल 12 आणि इतर जागांवर अन्य पक्ष आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, पटनाच्या जदयू कार्यालयावर पोस्टरबाजी सुरु झाली असून जनतेने 24 कॅरेट सोने निवडले असे म्हटले आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत 2.60 कोटी मतांची मोजणी झाली होती.
निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५ मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.\