- योगेश्वर माडगूळकर मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये २००९ मध्ये तेरा अपक्ष निवडणूक रिंगणात होते. तर २०१४ मध्ये अपक्षाच्या संख्येत घट झाली आहे. त्यांची संख्या ११ होती. यंदाच्या निवडणुकीत ती संख्या कायम आहे. तसेच अपक्षांना मिळालेल्या मतामध्ये सुमारे दहा हजार मतांची घट झाली आहे. २००९मध्ये अपक्षांना ४५०८२ मते मिळाली होती. तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ३५२८६ मते मिळाली होती.२०१४ मध्ये प्रमुख उमेदवारांच्या नावामध्ये साधार्म्य असणारे तीन उमेदवार रिंगणात होते. २००९ मध्ये असा कोणाताही फॉर्म्युला वापरण्यात आला नव्हता. २०१९ च्या निवडणुकीत नावात साधार्म्य असणारे उमेदवार नाहीत. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये असणाऱ्या उमेदवारांची संख्या सारखी आहे. हाच केवळ योगायोग आहे. विशेष म्हणजे, तीनही निवडणुकीत एक ही अपक्ष स्व:ताचे डिपॉझिट राखू शकला नाही. तिन्ही निवडणुकीत अपक्षांना त्यांचे डिपॉझिट गमवावे लागले आहे.२००९ मध्ये निवडणुकीत तेरा अपक्ष रिंगणात होते. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार हजार मतांचा टप्पा ओलांडू शकला नाही. २०१४ मध्ये ११ अपक्षांनी एक हजार मतांचा टप्पा ओलांडला होता. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक ८७६० मते एका अपक्ष उमेदवाराला पडली होती. एकूण झालेल्या मतदानापैकी शेकडा प्रमाण १.२२ टक्के होते. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एका अपक्षाला ८७६५ मते मिळाली होती. ती मते एकूण झालेल्या मतदानापैकी ०.७५ टक्के इतके आहे. विशेष म्हणजे, दोन्ही निवडणुकीत नोटा मतदान जास्त झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ही गत पंचवार्षिकसारखी आहे. हा केवळ योगायोग म्हणाला लागेल.
मावळ निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या मतदानात घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:03 AM