नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा 'ईव्हीएम'च्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत दिग्विजय यांनी भारताच्या राजकारणबाबत चिंता व्यक्त केली आहे. 'ईव्हीएम भारतीय लोकशाहीला उद्ध्वस्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि फेरफार केला जात असल्याचा आरोप देखील दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
"आपण निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला नाही तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल" असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे. 'फेसबुकनं उद्ध्वस्त केलेली लोकशाही' असा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये पत्रकार कॅरल कॅडवॉलर यांनी फेसबुकच्या माध्यमातून 'कॅम्ब्रिज अॅनालिटिका'च्या माध्यमातून निवडणुकांवर कशा पद्धतीनं प्रभाव पाडला हे सांगितलं आहे. त्यांचा तोच व्हिडीओ दिग्विजय यांनी शेअर केला आहे.
कॅरल कॅडवॉलर यांचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत सहा मिलियनहूनअधिक लोकांनी पाहिलाय. या व्हिडीओमध्ये त्या निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवर भाष्य करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिग्विजय यांनी राफेलवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. राफेल डीलच्या तपशिलांबाबत दिग्विजय सिंह यांनी सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्र सरकारने आता या डीलची किंमत सांगितली पाहिजे असं म्हटलं होतं.
"एका राफेलची किंमत काँग्रेस सरकारने 746 कोटी रुपये निश्चित केली होती, परंतु संसदेत आणि संसदेच्या बाहेरही अनेकवेळा मागणीकरूनही 'चौकीदार' महोदय आतापर्यंत राफेलची खरेदी किती रुपयांना केली, हे सांगण्यास टाळाटाळ करत आहेत, का? कारण, 'चौकीदार'ची चोरी उघडकीस येईल !! 'चौकीदार'जी, आता त्याची किंमत सांगा!!" असं ट्विट करत दिग्विजय सिंह यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या
भयंकर! 'त्या' हत्याकांडाचं गूढ उकललं; मुलीनेच केली होती आई, भावाची हत्या अन्...
"... मात्र पंतप्रधानांनी केली 'खेळण्यांवर चर्चा'", राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल