“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे”; PM मोदींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 08:46 AM2021-08-12T08:46:17+5:302021-08-12T08:51:57+5:30

कोरोना लसीकरण पत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.

diksha raut criticised pm modi over image on corona vaccine certificate | “आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे”; PM मोदींना टोला

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे”; PM मोदींना टोला

Next

मुंबई: गेल्या अनेकविध मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यात आता कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या फोटोच्या मुद्द्याची भर पडली आहे. कोरोना लसीकरण पत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरावरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की गाडी चालवण्याच्या परवान्यावर तरी आपला फोटो आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. (diksha raut criticised pm modi over image on corona vaccine certificate)

देशातील सुमारे ६ कोटी नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? पाहा, कारण

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल अनेकांकडून केला जात आहे. अनेक राज्यांनी तर त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो हा त्या प्रमाणपत्रावर असावा, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू आहे. यावरून राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कन्या दीक्षा राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. 

आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे

आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे. मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोरोनावर जागरूकता करू शकत नाही!, असे ट्विट दीक्षा राऊत यांनी केले आहे. दुसरीकडे, कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असल्याने राजकीय वादंग निर्माण झाला होता. राज्य सरकार कंपन्यांकडून लस खरेदी करत होते, तेव्हा अनेक राज्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह लसीकरण प्रमाणपत्र जारी केले होते. 

दबावातून अर्थव्यवस्था बाहेर पडतेय, सर्व क्षेत्रात वेगाने आर्थिक सुधारणा; केंद्राचा दावा

दरम्यान, कोरोना लसीकरण प्रमाणपत्र स्टँडर्डच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दिशानिर्देशाप्रमाणे आहे. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोसोबत एक संदेश जनहिताच्या दृष्टीकोनातून कोरोना नियमांचे योग्य पालन करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करते. जनहितासाठी लोकांपर्यंत महत्त्वाचे संदेश प्रभावीपणे पोहचावा याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लसीकरणासाठी एप्लिकेशनचा उपयोग करत आहेत. लसीकरण प्रमाणपत्र एक मानक स्वरुपात तयार केले आहे, असे उत्तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी दिले आहे. 
 

Web Title: diksha raut criticised pm modi over image on corona vaccine certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.