यवतमाळ: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Suicide Case:) चर्चेत आलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Shiv Sena Leader Sanjay Rathod) अखेर १५ दिवसांनंतर सर्वांसमोर आले. गेल्या १५ दिवसांपासून राठोड नॉट रिचेबल होते. ते समोर येत नसल्यानं महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेवर विरोधकांनी जोरदार टीका केली. राठोड यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून दूर करावं अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र राठोड मंत्रिपदी कायम आहेत.पूजा चव्हाण प्रकरणी चौकशीला सामोरे जावे; संजय राठोड यांना पोहरादेवी महंतांचा संदेशआज सकाळी संजय राठोड बंजारा समाजाचं महत्त्वाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. राठोड मंदिरात देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्या. त्यावेळीही त्यांच्या पत्नी सोबत होत्या. या अडचणीच्या काळात आपलं कुटुंब पाठिशी असल्याचा स्पष्ट संदेश यातून राठोड यांनी दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष लागलं आहे.“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर १५ दिवस वनमंत्री संजय राठोड कुठे होते?”राठोड यांचं शक्तिप्रदर्शन; पक्ष नेतृत्त्वाला संदेश?संजय राठोड गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता होते. आज ते समोर आले. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी पोहरादेवीला गर्दी केली. पोहरागडावर राठोड यांचे समर्थक शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते. त्यांनी राठोड याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 'कोण आला रे कोण आला रे, बंजारा समाजाचा वाघ आला', अशा स्वरूपाच्या घोषणा राठोड यांच्या समर्थकांनी दिल्या. माझा समाज माझ्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असा स्पष्ट संदेश राठोड यांनी त्यांचे पक्षप्रमुख आणि सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) दिल्याचं बोललं जात आहे. पोहरादेवीला शक्तिप्रदर्शन करून राठोड यांनी पक्षावर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांकडून थेट अन् स्पष्ट संदेश; आता काय करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 1:21 PM