शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 8:46 PM

Mohan Bhagwat News: सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे विधान केले आहे.

नवी दिल्ली - सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)यांनी लिंचिंगमध्ये (Lynching ) सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या (Hindutwa) विरोधात असल्याचे विधान केले आहे. गाझियाबाद येथे मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत मांडले. ("The DNA of all Indians is one, the idea of Hindu-Muslim unity is misleading, because They are not different" Mohan Bhagwat's big statement)

सरसंघचालक या कार्यक्रमात म्हणाले की, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक आहे. कारण ते वेगळे नाहीत तर एक आहेत. पूजा करण्याच्या पद्धतींवरून लोकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. काही कामं अशी असतात जी राजकारणाच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत. राजकारण लोकांना एकत्र आणू शकत नाही. राजकारण लोकांना एकजूट करण्याचे हत्यार बनू शकत नाही.

या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितले की, आम्ही गेल्या ४० वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए हा एकसारखा आहे. तसेच हिंदू आणि मुसलमान हे दोन समूह नाही आहेत. त्यांना एकजूट करण्यासाठी काही करण्याची गरज नाही, कारण ते आधीपासूनच एकजूट आहेत.

मोहन भागव यांनी सांगितले की, आम्ही एका लोकशाही देशात राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. केवळ भारतीयांचेच वर्चस्व असू शकते. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही आहे. एकतेचा आधार हा राष्ट्रवाद असला पाहिजे.

सरसंघचालक मोहन भागवत राजधानी दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबाद येथे आयोजित राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या कार्यक्रमामध्ये डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे अनावरण करण्यासाठी गेले होते. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय एक पहल नावाचे पुस्तक लिहिले आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या या कार्यक्रमात अनेक महत्त्वपूर्ण लोक सहभागी झाले होते.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूMuslimमुस्लीमHindutvaहिंदुत्वPoliticsराजकारणLynchingलीचिंगIndiaभारत