शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

ज्या पक्षावर टीका केली, त्याच पक्षात प्रवेश करताय? यावर एकनाथ खडसे म्हणाले...

By ravalnath.patil | Published: October 21, 2020 4:01 PM

BJP Eknath Khadse will Join NCP News: येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

ठळक मुद्देभाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम ठोकला आहे. आता ते  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या शुक्रवारी प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दशकापासून एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अलीकडच्या काळात एकनाथ खडसेंना पक्षात डावलले जात असल्याचे दिसून आले होते.

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तुम्ही प्रचंड टीका केली, त्याच पक्षामध्ये, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार आहात का? असा प्रश्न विचारला. त्यावर "मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांवर कधी टीका केली नाही. मी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर टीका केली, त्यावेळी मी राज्याचा विरोधी पक्षनेता होतो," असे उत्तर एकनाथ खडसे यांनी दिले.

देवेंद्र फडणवीसांवर टीकाभाजपाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी "गेल्या 40 वर्षात मी भाजपाचे काम केले. भाजपा जिथे पोहोचली नव्हती, तिथे आम्ही पोहोचवली. काही मिळाले, नाही मिळाले याचे दु:ख नाही, पण देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला," असे एकनाथ खडसे म्हणाले.

'चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही'भाजपकडून आपल्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सोडले तर एकाचाही फोन आला नाही, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. मात्र, चंद्रकांत पाटील सुद्धा आपण पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही पक्षा सोडू नका, एवढंच बोलले, असे एकनाथ खडसे म्हणाले.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील