शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

पंतप्रधानांना देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेश निवडणूक जिंकायचीय का?, ‘फाळणी स्मृती दिना’वरून नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 5:31 AM

nana patole : स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

नागपूर : देशाच्या फाळणीचाही स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. हे मोठे षडयंत्र आहे. फाळणीची मोठी किंमत या देशाने भोगली आहे. स्मृतिदिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांना पुन्हा हिंदू-मुस्लिम यांच्यात भांडण लावून व या देशाचे तुकडे करून उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकायची आहे का? अशी शंका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे ‘जरा याद करो कुर्बानी’ कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्रामतील सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, १४ ऑगस्ट १९४७ राेजी देशाची फाळणी झाली. त्या दिवशी मोठा रक्तपात झाला. हिंदू-मुस्लिम दंगल झाली. तो स्मृतिदिन पाळण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. अशा दिवसाचाही स्मृतिदिन कुणी पाळेल का? हे मोठे षडयंत्र आहे. आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर हे होत नाही ना, अशी शंका येते.भाजपने केवळ ओबीसींचेच आरक्षण संपवले असे नाही तर अनुसूचित जाती-जमातीचेही आरक्षण संपवण्याची तयारी केली असल्याचा इशारा पटोले यांनी कार्यक्रमात बोलताना दिला.

महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीनितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले ते दिल्लीतील नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. २५ वर्षे हे दोघेही सोबत होते. तेव्हा काही अडचण नव्हती. महामार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर काँग्रेस गडकरी यांच्या पाठीशी आहे. महामार्गाच्या कामातील भ्रष्टाचार व निकृष्ट दर्जा यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.

कोरोनाच्या रूपात केंद्राने मोठे कांड घडविलेकोरोनाच्या रूपात केंद्राने देशात जालियनवाला बाग हत्याकांडापेक्षाही मोठे कांड घडवून आणले. चीनमधून हा रोग भारतात कसा आला याचे उत्तर अजूनही पंतप्रधान देत नाहीत. कोरोनामध्ये लाखो लोक तडफडून मेले, याला केंद्र जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेNarendra Modiनरेंद्र मोदी