PM Narendra Modi Speech in Lok Sabha : देवाच्या कृपेने आम्ही कोरोनापासून वाचलो; नरेंद्र मोदींचे 'आश्चर्यकारक' वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:59 PM2021-02-10T16:59:43+5:302021-02-10T17:23:28+5:30
PM Narendra Modi Speech in Lok Sabha : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी कोरोनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला.
PM Narendra Modi Speech in Lok Sabha : कोरोना काळात आपण स्वत:बरोबरच जगालाही सावरले. हा भारतासाठी टर्निंग पॉईंंट आहे. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रत्येक शब्द प्रेरणादायी होता. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचा दरवाजा आपण वाजवत आहोत. हा मोठा क्षण आहे. महिला खासदारांनी मोठ्या संख्येने चर्चेत सहभाग घेतला, त्याचे आभार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले. (doctor, nurse is God's grace, who saved us from Corona.)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेतील चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी कोरोनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांवर मोदी बोलताना विरोधकांनी मोठा गदारोळ केला.
कोरोना प्रकोपात जग हलले, परंतू आम्ही वाचलो. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो असे मनीष तिवारी म्हणाले होते. मी म्हणतो डॉक्टर, नर्सच्या रुपात देव आला होता. डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी मृत्यूशी खेळत होते. मुलांना घरी ठेवून येत होते. त्यांच्या रुपात देव पावला, असे मोदी यांनी सांगितले.
परदेशांमध्ये लाखो-करोडो डॉलर तिजोरीत पडून होते. त्यांना त्यांचे नागरिक वाचविता आले नाहीत. पण आपण आत्मनिर्भर झालो, असे मोदी म्हणाले.
आधारविरोधात अनेक जण न्यायालयात गेले होते. मी आज यावर बोलणार आहे. आधारमुळे आज कोरोनाकाळात आम्ही जनधन, शेतकरी, पदपथवाले अशा अनेकांच्या खात्यात मदत पोहोचवली. आज आपल्याकडे विक्रमी जीएसटी जमा झाला आहे. ट्रॅक्टर, गाड्यांचा विक्रमी सेल झाला आहे. तीन कृषी कायदे आणले, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले.