मुंबई"ओबीसी प्रवर्गातील समाजाला त्यांचा न्याय आणि हक्काचं जे आहे ते देऊ. त्यांच्या हक्काचं जे असेल त्यातील एक कणही कमी होऊ देणार नाही", असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
...मग देशात घोषित आणीबाणी आहे का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
मराठा आरक्षणासाठी ओबीसीच्या आरक्षणाला सरकारकडून धक्का लावला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडी सरकारवर केला जात आहे. या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. "ओबीसी समाजामध्ये उगाच गैरसमज पसरवण्याचं काम कुणी करू नये. ओबीसींच्या हक्काचं जे आहे त्यातील एक कण सुद्धा कमी होऊ देणार नाही. ओबीसींच्या नेत्यांशीही सरकार चर्चा करत आहे. विरोधी पक्षांनी सरकारचा समतोल बिघडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये.", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं संस्कृतीमध्ये बसत नाहीदिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. एकतर तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी पण पाकिस्तानातून आणता का?", असा टोला उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला.