काँग्रेसचा मंत्री पडला भारी? किरण बेदींना पाँडिचेरीच्या राज्यपाल पदावरून हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 09:46 PM2021-02-16T21:46:15+5:302021-02-16T21:54:55+5:30
Kiran Bedi Removed As Puducherry Lt Governor Amid Congress Crisis: काँग्रेसने बेदी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच बेदी या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता.
पाँडिचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांना पदावरून हटविण्यात आले आहे. तेलंगानाचे राज्यपाल डॉ. तामिळीसाई सुंदरराजन यांच्याकडे पाँडिचेरी राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. (Kiran Bedi has been removed as Lieutenant-Governor of Puducherry, Rashtrapati Bhavan said in a statement released late Tuesday night.)
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पाँडिचेरीमध्ये (Puducherry) चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. ०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने ४ जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.
Dr. Kiran Bedi removed as the Lieutenant Governor of Puducherry
— ANI (@ANI) February 16, 2021
Dr. Tamilisai Soundararajan, Governor of Telangana, given additional charge as Lieutenant Governor of Puducherry pic.twitter.com/pSOoIgcCJK
यामुळे काँग्रेसने बेदी यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच बेदी या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसचे माजी मंत्री नमस्सीवायम यांनी बेदी यांना हटविण्याची अट ठेवत गेल्या महिन्यात दोन माजी आमदारांसह भाजपात प्रवेश केला होता. त्यांना भाजपाने शब्द दिला होता. यावरून बेदी यांना हटविण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे.
ए नमस्सीवायम आणि ई थिप्पाईंजन यांनी गेल्या महिन्यात 25 जानेवारीला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केला होता. यानंतर आणखी काही आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
दुसरीकडे एनआर काँग्रेसने ७ आणि मित्रपक्ष असलेल्य एआयएडीएमकेने ४ जागांवर विजय मिळवला होता. मात्र नायब राज्यपाल किरण बेदी यांनी भाजपाच्या तीन जणांना मतदानाचा अधिकार दिला होता. त्यामुळे ३० सदस्यीय विधानसभेची सदस्यसंख्या वाढून ३३ झाली होती.
दरम्यान, पाँडिचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यावर काम करू देत नसल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांच्याकडे किरण बेदींविरोधात पत्र दिले होते. नायब राज्यपालांकडून अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही मोकळ्या वातावरणात काम करू शकत नाही आहोत, असा आरोप नारायणसामी यांनी केला होता.