मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दोन आठवड्यांपूर्वी पंढरपूरात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं होतं. आंबेडकरांच्या आंदोलनानंतर वंचितनं हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची चर्चा सुरू झाली. आंबेडकर हिंदू धर्माकडे वळले, मंदिराच्या माध्यमातून सोशल इंजिनीयरिंग सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली. याच मुद्द्यावर आंबेडकर यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. मी कोणाला उत्तरं देत बसत नाही, मला जे वाटतं ते मी करतो, असं थेट उत्तर आंबेडकरांनी दिलं. मंदिर सुरू करण्याच्या मागणीमागील नेमका अर्थदेखील त्यांनी सांगितला.“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”धर्म, मंदिरं यांचा संबंध थेट अर्थकारणाशी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंदिरं सुरू करण्याची मागणी आम्ही केली. कारण मंदिरं सुरू झाल्यावर अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येण्यास मदत होईल. पंढरपूरातील मंदिर खुलं झाल्यावर त्या पाठोपाठ तुळजापूर, शेगाव, कोल्हापूर इथली मंदिरं सुरू होतील. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारचा १ लाख कोटींचा महसूल बुडणार आहे. त्यातील काही महसूल मंदिरं आणि त्याच्याशी संबंधित असलेलं अर्थकारण यांच्या माध्यमातून भरून निघेल, असं आंबेडकर म्हणाले.सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल?, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना शहाजोग सल्ला३१ ऑगस्टला आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली पंढरपूरात आंदोलन झालं. त्यानंतर राज्य सरकारनं आंबेडकर यांच्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. 'राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे,' असं आंबेडकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं. हा १० दिवसांचा कालावधी उलटून गेल्याची आठवण करून दिली असता, नियमावली तयार करण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. त्याबद्दलचा निर्णय याच आठवड्यात अपेक्षित आहे, असं आंबेडकर म्हणाले.
पंढरपूरातील आंदोलनानंतर काय म्हणाले होते आंबेडकर?मंदिरं खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन वंचितनं हिंदुत्व पकडलं का, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना आंदोलनानंतर विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून आंबेडकर काही सेकंद थांबले. 'महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, अशीच त्यांची भावना होती. आम्ही त्यांच्या विचारांनुसार चालतो. कोणी कोणाला मानायचं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणतीही व्यक्ती ते लादू शकत नाही,' असं उत्तर आंबेडकर यांनी दिलं. विठ्ठ्लाच्या भाविकांना पंढरपूरला यायचं आहे. विठोबाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र सरकारच्या नियमांमुळे त्यांना येणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही प्रार्थनास्थळं उघडण्याची भूमिका घेतली आणि आंदोलन केलं, असं ते पुढे म्हणाले होते.