नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक 2019च्या निकालासंदर्भात न्यूज चॅनल टाइम्स नाऊनं व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेतून भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपाला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, अशी शक्यता टाइम्स नाऊ आणि व्हीएमआरनं केलेल्या सर्व्हेतून व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेसला दक्षिण भारतात 2014च्या तुलनेत चौपट जागा (71) मिळतील, असाही अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.जानेवारीमध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून, या सर्वेक्षणातून वेगवेगळ्या राज्यांतील निकालासंदर्भात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत. तिथे आता निवडणुका झाल्यास काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला मोठा फायदा पोहोचू शकतो. यूपीए 39पैकी 35 जागांवर विजय मिळवेल, अशीही शक्यता व्यक्त केली आहे. तर एआयएडीएमके चार जागांवर विजय मिळवेल, असं चित्र आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला इथे खातंही उघडता येणार नाही. 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेनं 37 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांना खातंही उघडता आले नव्हते. भाजपा युती आणि इतरांच्या खात्यात 1-1 जागा गेली होती.केरळमध्ये लोकसभेच्या 20 जागा आहेत. जर आता निवडणुका झाल्यास भाजपाचं खातं उघडू शकते. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ 16 जागांवर विजय मिळवेल. कम्युनिस्टांना तीन जागा राखण्यात यश येईल. 2014च्या लोकसभा निवडणुकीत यूडीएफनं 12 जागा जिंकल्या होत्या. एलडीएफनं 8 जागांवर विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. जर आज निवडणूक लागल्यास वायएसआर काँग्रेस 23 जागांवर विजय मिळवेल. तेलुगू देसम पार्टी फक्त 2 जागा जिंकेल. इथे भाजपा आणि काँग्रेसला खातं उघडणंही अवघड आहे. 2014च्या निवडणुकीत टीडीपीनं 15 जागा जिंकल्या होत्या. तर वायएसआर काँग्रेसनं 8 जागांवर विजय मिळवला होता. भाजपानं 25 पैकी फक्त दोन जागा मिळवल्या होत्या.
दक्षिण भारतातल्या 131 जागांपैकी भाजपाला मिळणार फक्त 17, काँग्रेसच्या जागांमध्ये चारपट वाढ- सर्व्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 9:26 AM
न्यूज चॅनल टाइम्स नाऊनं व्हीएमआरबरोबर मिळून केलेल्या सर्व्हेतून भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठळक मुद्दे भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारतातल्या 131 लोकसभेच्या जागांपैकी भाजपाला फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागू शकतंकाँग्रेसला दक्षिण भारतात 2014च्या तुलनेत चौपट जागा (71) मिळतील, असाही अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.