शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

UP Election 2022: “BJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:25 PM

UP Election 2022: वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देभाजपवाल्यांची चांगलीच धुलाई कराBJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नकाओमप्रकाश राजभर यांच्या धक्कादायक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

वाराणसी: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यामध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या नेते ओमप्रकाश राजभर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मते मागायला आले, तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका, असे विधान केले आहे. (up election 2022 om prakash rajbhar advises women to beat up bjp leaders in varanasi)

ओमप्रकाश राजभर वाराणसी येथील भोजूबीर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी जर मते मागायला आली, तरी त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर, पण जातील चौघांच्या खांद्यावर, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

भाजपवाल्यांची चांगलीच धुलाई करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आग्रहाने जनधन खाती उघडायला लावली. यामागील मुख्य उद्देश त्या खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आता यापुढे भाजपवाले मते मागायला आले, तर त्यांची चांगलीच धुलाई करा. भाजपवाले येतील दोन पायांवर पण चौघांच्या खांद्यावरून परत जातील, असे वादग्रस्त विधान राजभर यांनी केले. तसेच महिलांचे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे. पुन्हा आलात, तर जीवंत परत जाऊ शकणार नाही. मोफत रेशन देऊन भाजप गरिबांना गुलाम बनवू पाहत आहे. देशातील सर्व भाजप नेत्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करायची वेळ आलीय, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथ