लोकमत न्यूज नेटवर्ककेडगाव (अहमदनगर) : ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारे आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे ३० वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात उतरल्याने या गावात दुरंगी लढत होत आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्यामुळे १९९० पासून गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून हे गाव कधीच निवडणुकीला सामोरे गेले नाही. मात्र, यंदा प्रथमच गावकरी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
कोणत्याच पक्षाचे बूथ न लागणारे गाव n आदर्श गाव हिवरे बाजारचा बिनविरोध निवडणुकीचा कानमंत्र फक्त गावातीलच नव्हे, तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवडणुकीत पाळला जात होता. गावकरी एकोप्याने गावातील निवडणूक हाताळत होते. n लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागले नाही किंवा पोलिंग एजन्ट नव्हते. n देशातील हे दुर्मीळ उदाहरण असून गावकऱ्यांना प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.
सात जागांसाठी सतरा उमेदवार रिंगणात पारनेर (जि. अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीत (ता. पारनेर) बिनविरोध निवडणुकीस सुरुंग लागत ७ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत. केवळ दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आमदार निलेश लंके यांनी पारनेर मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घेत प्रथम राळेगणसिद्धीत बैठका घेऊन बिनविरोधची हाक दिली होती.