नवी दिल्ली: गेल्या दोन लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्त्वावर थेट निशाणा साधल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. त्यांनी नेतृत्त्वावर थेट टीका केली नसली तरी पक्षामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवण्याची मागणी केली आहे. पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं. 'बंडखोरी एखाद्याला हटवण्यासाठी होते. वजीर राजावर सैन्य घेऊन हल्ला चढवतो आणि राजाला सिंहासन गमवावं लागतं, याला बंडखोरी म्हणतात. काँग्रेसमध्ये तशी स्थिती नाही. इथे आम्ही काही बदलांसाठी आग्रही आहोत. इथे वजीर राजाला त्याची चूक दाखवत आहेत. एखाद्या कृतीचे, निर्णयाचे परिणाम वजीर राजाला सांगत आहे. त्याला सतर्क करत आहे. आम्ही बदलांची मागणी करत आहोत. कारण बदल झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल', असं आझाद यांनी सांगितलं.
...तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकणार नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून घरचा अहेर
By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 7:02 PM