शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

'30 वर्षे पक्षासाठी काम करुनही न्याय मिळत नाही', सेनेच्या विदर्भातील एकमेव आमदाराने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 12:54 PM

Shivsena MLA Ashish Jaiswal: नागपूरमधील रामटेकचे चार टर्म आमदार आशिष जैसवाल पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्दे' पक्ष बाहेरुन आलेल्यांना संधी देतो, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही'

नागपूर: कालच शिवसेनेचे(shivsena) माजी राज्यमंत्री अशोक शिंदे(ashok shinde) यांनी राजीनामा दिला. त्यानंतर, आता विदर्भातील सेनेचा मोठा नेता पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरमधीलरामटेकमधून शिवसेनेच्या तिकीटावर चारवेळा निवडणूक आलेले आशिष जैसवाल(ashish jaiswal) पक्षावर नाराज आहेत. 'बाहेरच्यांना मंत्रिपदे मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही,' अशी खंत त्यांनी बोलून दाखवलीये.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना जैसवाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेचा एकही मंत्री नाही, मग पक्षाची वाढ कशी होणार ? मी 30 वर्षे सेनेत काम केले, पण कधीच न्याय मिळाला नाही. पक्ष बाहेरुन आलेल्यांना संधी देतो, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. आपल्या नेत्याला संधी मिळत नसल्याने कार्यकर्तेही नाराज असल्याचे जैसवाल यांनी सांगितले. 

शिवसेनेला काँग्रेसचा 'दे धक्का...'गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीने(ncp) काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता काँग्रेसने शिवसेनेला ‘दे धक्का’ देण्याचे ठरवले. शिवसेनेचे उपनेते आणि युती काळातील राज्यमंत्री असलेले अशोक शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले आहे. वर्धाच्या हिंगणघाट येथील माजी आमदार अशोक शिंदे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. दिल्लीत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशोक शिंदे यांच्यासोबत ठाणे, भिवंडी येथील सुरेश म्हात्रे यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. सुरेश म्हात्रे यांनी याआधीच शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला जोरदार धक्का बसणार आहे.  

 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरramtek-pcरामटेकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshish Jaiswalआशीष जयस्वाल