शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

Farmers Protest : या राज्यातील भाजपा सरकार संकटात, विरोधक आणणार अविश्वास प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 10:23 AM

Farmers Protest: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब विविध राज्यांमध्ये बसत आहे.

ठळक मुद्देहरियाणाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहेराज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहेकाँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे

चंदिगड - गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे (Farmers Protest) केंद्रातील मोदी सरकारच्या नाकी नऊ आणले आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या आंदोलनाचा फटका भाजपाला पंजाब (Punjab), पश्चिम उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि हरियाणामध्ये बसत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता हरियाणामधील भाजपा सरकार संकटात सापडले आहे. (Congress will bring a no-confidence motion against Khattar Government) हरियाणामधील मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याचा दावा करत विरोधकांनी या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केली आहे. (BJP government in crisis in Haryana due to Farmers Protest)शेतकरी आंदोलन तीव्र होत असतानाच हरियाणामध्ये राजकारणही तापले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी राज्यातील मनोहरलाल खट्टर सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. हुड्डा म्हणाले की, राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे काँग्रेस या सरकारविरोधात विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहे. खट्टर सरकारमधील मित्रपक्षाचे आमदारच हे सरकार सर्वात भ्रष्ट असल्याचे सांगत आहेत.

मनेहरलाल खट्टर सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तसेच भाजपा-जजपा आघाडीतील काही आमदारच हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचे सांगत आहे, असा टोला भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी लगावला आहे.दरम्यान, हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाने कृषी कायद्यांवरून भाजपाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. सोनीपतमधील पुरखास गावात राज्यसभा खासदार आणि काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी रविवारी शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच जेव्हापासून देशात भाजपाचे सरकार आले आहे. तेव्हापासून देशातील जनता त्रस्त झालेली आहे. वाढत्या महागाईने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनHaryanaहरयाणाBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण