नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाची परदेशी कलाकारांनी घेतली, एका व्यक्तीने परदेशातून आंदोलनाला पाठिंबा दिला तर तिळपापड होण्याची गरज नाही, आपणदेखील ट्रम्प यांना अमेरिकेत जाऊन पाठिंबा दिला होताच.अबकी बार ट्रम्प सरकार काय म्हणण्याची गरज नाही, तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची गरज काय? असा सवाल शिवसेनेची खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरही टीका करताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात, शेतकरी नेत्यांनी चर्चा करावी, आंदोलन संपवावं, हे आम्हालाही वाटतं, तुम्ही शेतकरी नेत्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा...हजारो शेतकरी ३ महिन्यापासून ऊन, पावसात दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत, तुम्ही त्याची दखल घ्या ना...भाषण करायला काय झालं, संसदेत भाषण केलं किंवा बाहेर केलं त्यातून निष्पन्न काय झालं? असंही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे(Sanjay Raut Reaction on PM Narendra Modi Speech in Rajyasabha)
तर विरोधकांनी कृषी विधेयकावरून यू टर्न घेतल्याचा आरोप पंतप्रधानांनी संसदेत केला होता, त्यावर राऊतांनी सांगितले की, प्रश्न घुमजावचा नसतो, लोकशाहीत लोकमताचा आदर करण्याचा असतो. घुमजावाचा मुद्दा काढला तर इतिहासात अनेकजणांनी केला आहे, ज्यांच्यासाठी हा कायदा आहे, त्यांना वाटतं हा कायदा आम्हाला खड्ड्यात घालणारा आहे. मग सरकारने एक पाऊल मागे यावं, त्याने सरकारच्या प्रतिष्ठेची उंची कमी होत नाही, अहंकार नको असा टोला त्यांनी पंतप्रधानांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे, त्याचसोबत पंतप्रधान सांगतात चर्चा करा, मग पुढाकार पंतप्रधानांनी घ्यायला हवा ना...शेतकरी अज्ञान आहेत, त्यांना MSP आणि शेतीव्यतिरिक्त इतर काही कळत नाही. तुम्ही पुढाकार घेऊन गाझीपूरला जा, चर्चा करा तिथे शेतकरी आहे असंही राऊत म्हणाले आहेत.
सेलिब्रिटी ट्विट गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही.
शेतकरी आंदोलनावरून पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर बॉलिवूड आणि क्रीडा जगतातील अनेक सेलेब्रिटींनी यावर ट्विट केले. यातील काही ट्विटमध्ये सगळे शब्द तंतोतंत सेम होते, यावरून काँग्रेस नेत्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत गृहमंत्री अनिल देशमुखांनी या ट्विटची चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र शिवसेनेने याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. परदेशातून एका व्यक्तीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला तर तिळपापड होण्याची गरज नाही, आपणदेखील ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता ना, नमस्ते ट्रम्पची गरज काय होती? या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची गरज नाही असं सांगत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. (ShivSena Reaction on Celebrities Tweets on Farmers Protest)
आम्ही पंतप्रधानांचा अनादर केला नाही
पंतप्रधानांबद्दल आदर आहे, त्यांच्या भूमिका पटत नसतील तर त्यांच्यावर टीका करू पण आम्ही कधीही पंतप्रधानपदाची प्रतिमा खराब होईल अशी खालच्या शब्दात टीका केली नाही. तरीही पंतप्रधानांनी खिलाडू वृत्तीने या गोष्टींकडे पाहायला हवं असं सांगत संजय राऊतांनी मोदींच्या टीकेवर भाष्य केले आहे. (Sanjay Raut on Narendra Modi)
काँग्रेसची तक्रार अन् राष्ट्रवादीची एक्शन
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी शेतकरी आंदोलनावरून काही सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटवर आक्षेप घेतला आहे. यात अनेक ट्विट एकसारखे होते, त्यामुळे या ट्विटची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली, यावर गृहमंत्री अनिल देशमुखांनीही त्यांनी चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं, हा गंभीर मुद्दा आहे, या सर्व सेलिब्रिटींचे ट्विट एकसारखे कसं असू शकतं? त्यांच्यावर कोणी दबाव टाकत आहे का? याचा तपास करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुखांनी पोलिसांना दिल्याचं सचिन सावंत यांनी सांगितले. (Sachin Tedulkar & Lata Mangeshkar Tweet Enquiry)