"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 09:22 AM2021-03-08T09:22:35+5:302021-03-08T09:23:27+5:30

farooq abdullah got a fake call : विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee | "ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

"ममता बॅनर्जींना पाठिंबा देण्यासाठी 50 लाखांची ऑफर", फारूक अब्दुल्ला यांना फेक कॉल

googlenewsNext
ठळक मुद्देउधमपूरमध्ये फारूक अब्दुल्ला हे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी मोठा खुलासा केला आहे. बनावट कॉलद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे. मला एक फोन आला ज्याद्वारे सांगण्यात आले की, तुम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ प्रचार केला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील, असे फारूक अब्दुल्ला यांनी सांगितले. उधमपूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. (farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee)

फारूक अब्दुल्ला म्हणाले, "या महिन्यात मला झारखंडहून फोन आला होता, ज्यामध्ये मला सांगण्यात आले की झारखंडचे मुख्यमंत्री तुमच्याशी बोलणार आहेत, सध्या ते दुसर्‍या कॉलवर व्यस्त आहेत. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर मला दुसऱ्यांदा कॉल आला. त्यावेळी सांगण्यात आले की, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, ते ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालला जात आहेत. तुम्हीही ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला ५० लाख रुपये मिळतील."

'देवेगौडा यांनाही फसवण्याचा प्रयत्न'
फारूक अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पार्टीच्या एका खासदारांसोबत यासंदर्भात चर्चा केली. तर त्या खासदारांनी सांगितले की, असे काहीच नाही. इतकेच नव्हे तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनाही असाच फोन आला असल्याचे या खासदाराने सांगितले, असे फारूक अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षांनी फसवण्यासाठी ही युक्ती केली आहे, असा आरोप फारूक अब्दुल्ला यांनी केला आहे.

याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील लोक प्रार्थना करत आहे की, भारत- पाकिस्तान दरम्यान नुकताच झालेला करार कायम रहावा, कारण यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळेल, असे उधमपुरमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना फारूक अब्दुल्ला म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "सीमेवरचा तणाव केवळ स्थानिक लोकांच्या जीवनात दुःख आणि वेदना आणतो, शेती व आर्थिक कामे थांबतात आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रातील जीवनशैली त्याचा परिणाम होतो."
 

Web Title: farooq abdullah got a fake call where he was offered rs 50 lakh to support mamta banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.