काँग्रेसवर बसरले फारुख अब्दुल्ला; म्हणाले, "काँग्रेस कमकुवत झाली, घरी बसून काम चालणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:04 PM2021-03-23T17:04:48+5:302021-03-23T17:06:15+5:30
Farooq Abdullah on Congress : देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे, अब्दुल्ला यांचं वक्तव्य
एकेकाळी अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रात सत्तेत असलेली काँग्रेस सध्या तितक्या चांगल्या स्थितीत नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर काही राज्यांमधील निवडणुकांमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आता कमकुवत झाली असून घरात बसून काम चालणार नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
"काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. मी हे अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो. जर त्यांना देश वाचवायचा आहे तर पुन्हा काँग्रेसला जागं करणं आवश्यक आहे. तसंच त्यांना मजबूतीनं पुन्हा उभं राहावं लागेल. त्यांना लोकांच्या समस्यांबद्दलही जाणून घ्यावं लागेल आणि हे सर्व घरी बसून होणार नाही," असं अब्दुल्ला म्हणाले.
Congress has become weak. I am saying this honestly. Congress will have to wake up and stand strong if they want to save the country. They will have to look after problems faced by people. This won't happen while sitting at home: National Conference President Farooq Abdullah pic.twitter.com/jPggAtxWL2
— ANI (@ANI) March 23, 2021
यावेळी त्यांनी काँग्रेससोबत भाजपवरही निशाणा साधला. "त्यांनी नुकतंच सांगितलं होतं की ते पुढील सरकार स्थापन करतील. हे कसं होईल हे मी पाहणार आहे. ते काय आकाशातून येतील? आम्ही त्यांच्या मार्गांमध्ये उभे राहू आणि तुम्ही आम्हाला कसं हटवाल. नॅशनल कॉन्फरन्सचा इतिहास हा बलिदान देण्याचा आहे. पक्षा जनतेच्या हृदयात आहे," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता ते निवडणुकांसाठी लोकांच्यामध्ये असंतोष पसवत आहेत, असा आरोपही केला.