नवी दिल्ली:दिल्लीतील जंतर-मंतरवर भडकाऊ भाषण आणि घोषणा दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये एफआयआर दाखल करुन व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरलहोत आहे. या व्हिडिओत काही लोक एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह भाषण करत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रविवारी जंतर-मंतरवर काही संघटनांनी क्विट इंडिया मूव्हमेंट आणि इंग्रजांनी बनवलेले जुने कायदे परत घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. यातील काही लोकांनी एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याची माहिती आहे.
'भारत जोडो मूव्हमेंट'च्या नावे एकत्र आले लोकपोलिसांनी सांगितल्यानुसार, रविवारी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे काही लोक 8 ऑगस्ट 1947 ला झालेल्या 'भारत छोडो आंदोलना'च्या धर्तीवर ‘भारत जोडो मूव्हमेंट’ नावावर एकत्र आले होते. लोकांना येकत्र आणण्यासाठी या आंदोलनाचा सोशल मीडियावर चांगलाच प्रचार करण्यात आला होता. जंतर-मंतरवर सेव्ह इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीत सिंह आणि महासचिव अरविंद त्यागी यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे जेष्ठ पकील अश्विनी उपाध्याय, नीरज नक्षत्र चौहान, लोकसंख्या समाधान फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल चौधरी, हिंदू रक्षा दलाचे भूपेंद्र चौधरी, आर्य निर्मात्री सभेचे सुनील आर्य, देवसेनेकडून वृजभूषण सैनी, मां कामधेनु फाउंडेशनचेसे दीपक तोमर, हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता आणि देशभरातून शेकडो लोक आले होते.
यूनायटेड भारतासाठी कार्यक्रमपोलिसांनी सांगितल्यानुसार, अश्विनी उपाध्यायने हा कार्यक्रम आयोजित केला होता. आता याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीकडे अश्विनी उपाध्याय म्हणाले की, त्यांचा कार्यक्रम यूनायटेड भारतासाठी होता. ज्यांनी धर्मविरोधी घोषण दिल्या, त्यांचा आमच्या संघटनेची काही संबंध नाही. ते स्वतः आता पोलिसांत याप्रकरणी तक्रार देण्यसाठी जात आहेत.