‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’
By बाळकृष्ण परब | Published: October 4, 2020 03:37 PM2020-10-04T15:37:56+5:302020-10-04T15:43:53+5:30
Rahul Gandhi Kheti Bachao Yatra News : ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.
नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. पंजाबमधील मोगा येथून शेती बचाव आंदोलनाची सुरुवात केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारला हे कायदे संमत करून घ्यायचे होते तर सर्वात आधी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.
शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना हमी देऊ इच्छितो की, ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवशी या तिन्ही काळ्या कायद्यांना नष्ट करेल आणि या कायद्यांना कचऱ्यांच्या डब्यात फेकून देईल. मी पंजाबमधील शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही. मोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहे. तसेच शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही,
राहुल गांधी म्हणाले की जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे.
I give you guarantee that the day Congress party come to the power, we will scrap these three black laws and throw them in waste paper basket: Congress leader Rahul Gandhi, in Punjab's Moga during party's 'Kheti Bachao Yatra'. #FarmBillspic.twitter.com/dC1ER8bPAM
— ANI (@ANI) October 4, 2020
अनिल विज म्हणाले, राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाही
राहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे.
काँग्रेस पक्षाने आज पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू केले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. या मोहिमेदरम्यान राहुल गांधी खेड्यांमधील शेतकऱ्यांना भेटतील. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे तीन हजार शेतकरी सहभाग घेतला आहे. या रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड़ यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलाने राहुल गांधी यांना दोन प्रश्न विचारले आहेत. एक म्हणजे, ज्यावेळी लोकसभेत कृषी संबंधित तीन बिले सादर केली जात होती, त्यावेळी तुम्ही गैरहजर का होता? आणि दुसरा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पारंपारिक कृषी उत्पन्न पणन समिती (एपीएमसी) हटविण्याविषयी चर्चा का केली होती? असे सवाल शिरोमणी अकाली दलाने केले आहेत.
#WATCH: Punjab: CM Captain Amarinder Singh, Congress leader Rahul Gandhi, party's state chief Sunil Jakhar take part in tractor yatra from Badhni Kalan to Jattpura as part of party's 'Kheti Bachao Yatra'. pic.twitter.com/TpXTpxcGCx
— ANI (@ANI) October 4, 2020