शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

‘’काँग्रेस सत्तेवर आल्यावर पहिल्याच दिवशी तिन्ही कृषी कायद्यांना कचऱ्याचा डबा दाखवणार’’

By बाळकृष्ण परब | Published: October 04, 2020 3:37 PM

Rahul Gandhi Kheti Bachao Yatra News : ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.

ठळक मुद्देकाँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहेमोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहेशेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची मोदी सरकारची तयारी

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. पंजाबमधील मोगा येथून शेती बचाव आंदोलनाची सुरुवात केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, जर सरकारला हे कायदे संमत करून घ्यायचे होते तर सर्वात आधी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांच्याबाबत चर्चा व्हायला हवी होती. ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल. त्याच दिवशी या तिन्हा काळ्या कायद्यांना संपुष्टात आणून कचऱ्याच्या डब्यात फेकून देईल, असा शब्द राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिला.शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी शेतकऱ्यांना हमी देऊ इच्छितो की, ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल, त्या दिवशी या तिन्ही काळ्या कायद्यांना नष्ट करेल आणि या कायद्यांना कचऱ्यांच्या डब्यात फेकून देईल. मी पंजाबमधील शेतकऱ्यांना विश्वास देऊ इच्छितो की, काँग्रेस देशभरातील शेतकऱ्यांच्या सोबत उभी आहे. काँग्रेस आपल्या आश्वासनापासून एक इंचही मागे हटणार नाही. मोदी सरकार एमएसपीला संपवू इच्छित आहे. तसेच शेतीचा सर्व बाजार अंबानी आणि अदानींना सोपवण्याची तयारी करत आहे. मात्र काँग्रेस पक्ष असे होऊ देणार नाही,राहुल गांधी म्हणाले की जर शेतकरी या नव्या कायद्यांमुळे समाधानी असतील तर देशभरात शेतकरी आंदोलन का करत आहेत. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन का करत आहेत. तसेच कोरोनाकाळात हे तीन कायदे लागू करण्याची काय घाई होती, असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. अनिल विज म्हणाले, राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात येऊ देणार नाहीराहुल गांधींच्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप हरयाणामध्ये होणार आहे. कुरुक्षेत्रमध्ये ही रॅली थांबविण्यात येणार आहे. मात्र राहुल गांधींच्या ट्रॅक्टर रॅलीला राज्यात प्रवेश करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी घेतली आहे.काँग्रेस पक्षाने आज पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून 'शेती वाचवा' अभियान सुरू केले आहे. या तीन दिवसीय अभियानाचे नेतृत्व पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. या मोहिमेदरम्यान राहुल गांधी खेड्यांमधील शेतकऱ्यांना भेटतील. या ट्रॅक्टर रॅलीत सुमारे तीन हजार शेतकरी सहभाग घेतला आहे. या रॅलीवरून हरयाणाचे माजी कृषिमंत्री आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष ओपी धनखड़ यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी यांना राज्यात ट्रॅक्टर रॅली घ्यायची असेल तर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांनाही बरोबर आणावे, असे ओपी धनखड़ यांनी म्हटले आहे.दुसरीकडे, शिरोमणी अकाली दलाने राहुल गांधी यांना दोन प्रश्न विचारले आहेत. एक म्हणजे, ज्यावेळी लोकसभेत कृषी संबंधित तीन बिले सादर केली जात होती, त्यावेळी तुम्ही गैरहजर का होता?  आणि दुसरा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पारंपारिक कृषी उत्पन्न पणन समिती (एपीएमसी) हटविण्याविषयी चर्चा का केली होती? असे सवाल शिरोमणी अकाली दलाने केले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीagricultureशेतीPunjabपंजाबIndiaभारत