शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

पवारांना पहिल्यांदाच मी इतकं संतापलेलं पाहिलं, ते त्र्यागानं बैठकीतून निघाले; राऊतांचा गौप्यस्फोट

By कुणाल गवाणकर | Published: November 29, 2020 9:21 AM

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण; 'रोखठोक'मधून संजय राऊतांचे गौप्यस्फोट

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या वर्षी ३७ दिवस राज्यात सत्तानाट्य सुरू होतं. या कालावधीत राजकारणातील डाव-प्रतिडाव राज्यानं पाहिले. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेनं सोडलेली भारतीय जनता पक्षाची साथ, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळवलेला हात, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी, अजित पवारांनी राजीनामा, फडणवीस यांचं कोसळलेलं सरकार आणि उद्धव ठाकरेंचा शीवतीर्थावरील शपथविधी अशा उत्कंठावर्धक घटना या सत्ता नाट्यात घडल्या. या संपूर्ण घटनाक्रमाला वर्ष उलटत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून काही गौप्यस्फोट केले आहेत.संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावाराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधणारे संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या सातत्यानं संपर्कात होते. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या एका बैठकीत नेमकं काय घडलं होतं, याची माहिती राऊत यांनी त्यांच्या लेखात दिली आहे. कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया'शरद पवार व माझ्यात ३५ दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. १७ नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ''तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?'' तेव्हा ''आमचा आकडा १७० आहे'' असे मी सांगितले. त्या १७० आकड्याची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे श्री. पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला,' असं राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तरराष्ट्रवादी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास उत्सुक होती. त्यासंदर्भात त्यांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठकही झाली होती, असा दावा नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'ट्रेडिंग पॉवर' पुस्तकात करण्यात आला. मात्र राऊत यांनी हा दावा खोडून काढला आहे. 'अजित पवारांचा फोन नेहरू सेंटरमधील बैठकीनंतर 'स्विच ऑफ' झाला व दुसऱया दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ''तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली. पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सोशल माध्यमांवर मान्य केले आहे.'' मी त्याक्षणीही सांगितले, ''चार वाजेपर्यंत थांबा. अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वतः अजितदादाही गुदमरून परत फिरतील.'' हे यासाठीच सांगायचे की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली अशा प्रकारच्या गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे 'नाट्य' तयार झाले हे सर्वस्वी चूक आहे,' असा दावा राऊत यांनी केला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार