नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले गेले. आता राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्या बाजूने वळवता येईल या उद्देशाने. पाच उप मुख्यमंत्री बनवण्याची तयारी पक्ष करीत आहे. दरम्यान, बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शहा यांनी त्यांना उत्तम प्रशासन द्या, असे म्हटले. ‘‘आपण जो विश्वास माझ्यावर दाखवला तो मी योग्य ठरवीन,” असे मी त्यांना म्हणालो, असे बोम्मई यांनी सांगितले. बोम्मई यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचीही भेट घेतली.
कर्नाटकात आता पाच उपमुख्यमंत्री?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 8:13 AM