मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, खा. प्रीतम मुंडे, खा. आनंदराव अडसूळ आदी दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणाºया दुसºया टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे. राज्याच्या १० मतदारसंघातील या निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे.अमरावती, सोलापूर आणि लातूर या तीन जागा अनुसूचित जातींसाठी राखीव असून, सध्या त्या शिवसेना व भाजपच्या ताब्यात आहेत. बीडमध्ये प्रीतम मुंडे तर अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा या दोन प्रमुख महिला उमेदवार आहेत. दहापैकी तीन जागा विदर्भातील, सहा जागा मराठवाड्यातील असून, एक पश्चिम महाराष्ट्रातील आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहापैकी सात जागांची निवडणूक झाली. त्यामुळे फोकस विदर्भावर होता. आता दुसºया टप्प्यात मराठवाड्यावर फोकस असेल. मराठवाड्यात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत.दुसºया टप्प्यातील दहा जागांपैकी सध्या भाजप-शिवसेनेचे नऊ ठिकाणी खासदार आहेत, तर नांदेडची एकच जागा काँग्रेसकडे आहे. नऊ जागा टिकविण्याचे आव्हान युतीसमोर असेल, तर ताकद वाढल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान हे महाआघाडीसमोर असेल.युतीचा विचार करता शिवसेना पाच (अमरावती, बुलडाणा, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली) तर भाजप पाच (अकोला, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर) जागा लढत आहे. महाआघाडीचा विचार करता काँग्रेस अकोला, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर या पाच जागा लढत असून, बुलडाणा, परभणी, बीड, उस्मानाबाद या चार जागा राष्ट्रवादी लढत आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील अमरावतीच्या जागेवर युवा स्वाभिमानीच्या नवनीत कौर राणा लढत आहेत. गेल्या वेळी त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या.वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांतून लढत असून दोन्ही ठिकाणी १८ एप्रिलला मतदान होत आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या दोन्ही जागांसाठी (नांदेड, हिंगोली) या टप्प्यात मतदान होत आहे.>दुरंगी, तिरंगी सामनादहापैकी लातूर, नांदेड या दोन ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे. अकोला आणि नांदेडमध्ये भाजप, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी असा तिरंगी सामना आहे. बुलडाणा, परभणी, उस्मानाबादमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादी असा सामना आहे. अमरावतीत शिवसेना विरुद्ध महाआघाडीच्या नवनीत राणा कौर (युवा स्वाभिमान) अशी चढाओढ आहे. हिंगोलीत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आहेत. या दहापैकी किमान चार ठिकाणी बहुजन वंचित आघाडीने चांगले आव्हान दिले आहे.
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात फोकस मराठवाडा, दहा जागांचे भवितव्य ठरणार १८ एप्रिलला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 4:55 AM