Yashwant Sinha Joins TMC : "... तेव्हाच ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला"; माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हांचा TMC मध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 02:09 PM2021-03-13T14:09:15+5:302021-03-13T14:25:41+5:30
Yashwant Sinha Joins TMC : अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Assembly Election 2021) सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. राजकीय वातावरण तापलं आहे. याच दरम्यान अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणारे यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते. त्यानंतर आता शनिवारी (13 मार्च) सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडलं जाऊ शकतं.
'ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला' असं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान सिन्हा यांनी भाजपावर देखील हल्लाबोल केला आहे. "अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपाचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता. मात्र आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपामधून वेगळे झाले आहेत. आज भाजपासोबत कोण उभं आहे?' अशा शब्दांत यशवंत सिन्हा यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
BJP during Atal Ji's time believed in consensus but today's government believes in crushing & conquering. Akalis, BJD have left the BJP. Today, who is standing with BJP?: Yashwant Sinha, TMC, in Kolkata pic.twitter.com/6bx5S64t5I
— ANI (@ANI) March 13, 2021
आयएएसची नोकरी सोडून यशवंत सिन्हा राजकारणात दाखल झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्येही ते मंत्री होते. अटल बिहारी वाजपेयींच्या ते अगदी जवळचे नेते होते. परंतु, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा मात्र वेगळी असल्याचं मत त्यांनी अनेकदा व्यक्त केलं. यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारचा अनेकदा विरोध केला होता. मोदींच्या आर्थिक धोरणांसहीत परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी अनेकदा उघडपणे टीका केली होती. यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत सिन्हा हे मात्र भाजपाचे खासदार आहेत.
Kolkata: Former BJP leader Yashwant Sinha joins Trinamool Congress, ahead of West Bengal Assembly elections pic.twitter.com/K3s9TQNPlS
— ANI (@ANI) March 13, 2021
"गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत", बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी यांचा TMCमध्ये प्रवेश
बंगाली अभिनेत्री सायंतिका बॅनर्जी (Syantika Banerjee) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला आहे. टीएमसीचे महासचिव पार्थ चॅटर्जी, मंत्री सुब्रत चॅटर्जी आणि ब्रात्य बसु यांच्या उपस्थितीत सायंतिका यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सायंतिका बॅनर्जी यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करताच भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंगालला केवळ ममता दीदी हव्या आहेत. "मला ही संधी दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे मनापासून आभार. मी आज अधिकृतरित्या TMC मध्ये प्रवेश केला. मात्र खरं सांगायचं झालं तर गेल्या 10 वर्षांपासून मी ममता दीदींसोबत आहे. हीच वेळ आहे मतदारांकडे आपलं भविष्य उज्वल करण्याची. बंगालला फक्त बंगालची मुलगी हवी आहे. बंगालला केवळ ममता बॅनर्जी हव्या आहेत" असं सायंतिका बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ग्लॅमरचा तडका, अभिनेत्रीची राजकारणात उडी https://t.co/roimgCbg5n#WestBengalElection2021#WestBengal#SayantikaBanerjee#TMC#MamataBanerjeepic.twitter.com/0Dk2W9xotM
— Lokmat (@MiLOKMAT) March 3, 2021