शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

Devendra Fadnavis : "आम्ही भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 8:17 PM

Devendra Fadnavis : आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पाडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ठळक मुद्देया पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणे नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई : आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही, असे विधान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच, आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 'लोकसत्ता'ने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. (former chief minister and bjp leader devendra fadanvis slams maharashtra government)

सरकार पडणे हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, "आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळ भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावे लागेल. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचे नाही".

याचबरोबर, सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणे आमचे बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. याशिवाय, या वेबिनारमध्ये अंतर्गत विरोधाभास दिसत असताना त्याला पाडणे हाच भाजपाचा कार्यक्रम असल्याची प्रतिमा का निर्माण होत आहे? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आला. यावर, "अशी प्रतिमा काही निर्माण होत नाही. पण माध्यमांनाही बातमी मिळते की हे पाडण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतात. या पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणे नाही", असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

'हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल'"मी म्हणालो होतो त्याप्रमाणे घडत आहे. आपल्या अंतर्गत विरोधाने हे सरकार पडेल सांगितले तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हते. पण आता लोकांना जाणवू लागले आहे. धोरणात्मकतेचा अभाव लोकांना जाणवत आहे. मी गंमतीने तीन पायांची रिक्षा असून तीन पाय वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचे म्हणायचो, पण आज हे जाणवत आहे. मला वाटते आमच्याकडे खूप संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचे काम अचूक करत आहोत. जनतेची गाऱ्हाणी मांडत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला काही करायची गरज नाही, हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'तो निर्णय चूकच होता, पण पश्चाताप नाही'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पाहाटेचा शपथविधी सोहळ्याची अद्यापही चर्चा होताना दिसते. अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीमुळे आपल्या प्रतीमेला तडा गेला असे विधान पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. ते म्हणाले, "आपला तो निर्णय चुकीचाच होता. पण त्याचा आता पश्चाताप नाही. ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावे लागते. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचे होते. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केले. परंतु ते चुकीचे होते आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडले नाही. त्यांच्यात माझी जी प्रतीमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला," असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण