keral politics: केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने मुंडन करणाऱ्या राज्य महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा लतिका सुभाष (Lathika Subhash) या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या (sharad Pawar) राष्ट्रवादीचे केरळ प्रदेशाध्यक्ष पी सी चाको यांच्यासोबत लतिका यांची चर्चा झाली असून लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. (Former Mahila Congress Chief Lathika Subhash is likely to join the National Congress Party. )
महत्वाचे म्हणजे काँग्रेस कार्य़ समितीचे सदस्य असलेले चाकोदेखील याच महिन्यात राष्ट्रवादीमध्ये आले होते. चाको यांनी 10 मार्चला काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी मुंबईत येत निवडणुकीचा प्रचार सुरु असताना शरद पवारांची भेट घेतली होती. विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी केल्याचा आरोप चाको यांनी केला होता.
'तुम्ही भाजपाचे खासदार, मग मोदींना भेटत का नाही?' ट्विटरवरील प्रश्नावर सुब्रमण्यम स्वामींचे उत्तर...
राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. तसेच चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे मी चाकोंसोबत चर्चा केली. लवकरच माझ्या निर्णय़ाची घोषणा केली जाणार आहे, असे लतिका सुभाष यांनी सांगितले.
लतिका सुभाष यांचा अनुबव पाहता त्यांना पक्षात एक मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सुभाष या 6 एप्रिलला झालेल्या विधानसभा निवडणुकीत एत्तुमानूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या होत्या. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपण अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले होते.