शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

मनसेकडून विधानसभेची पायाभरणी? लोकसभा निवडणुकीत ताकदीची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 12:59 AM

इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित

ठाणे : गेल्या १० वर्षांत मनसेला ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महापालिकेत केवळ सात नगरसेवक निवडून आणता आले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या मतांची कमाई करणाºया राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नसला, तरी राज यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला धडाका पाहता आणि ठाण्यात एक दिवसाचा मुक्काम पाहता विधानसभेची ही पायाभरणी असल्याने ठाण्यामधून इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.राज्यात मनसेला सर्वाधिक यश नाशिक शहरात मिळाले होते. तशीच मोर्चेबांधणी त्यांनी ठाण्यातही केली होती. त्यानुसार, २००९ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती. तर, विधानसभा निवडणुकीतही मनसेला तिसºया क्रमांकाची मते मिळाली होती.

त्यानंतर, २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तब्बल सात नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु, मागील काही वर्षांत मनसेची अधोगती झाली. २०१४ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी सपाटून मार खाल्ला. तर, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेला भोपळासुद्धा फोडता आला नाही. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार न देता भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी राज्यात जाहीर सभांचा लावलेला एकूणच धडाका आणि ‘लाव रे तो व्हिडीओ’ यामुळे सोशल माध्यमातून मनसेचा बोलबाला सुरू आहे. सत्ताधारी भाजपनेही राज यांच्या सभांचा धसका घेतला आहे.
राज यांच्या सभांना राज्यभर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मरगळलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चैतन्य निर्माण झाले असून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभेत मनसे साºया शक्तिनिशी उतरण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत असल्याने विधानसभा निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी किमान दोन विधानसभा मतदारसंघांत चमत्कार घडवू शकते, इतकी ताकद पक्षाच्या मतांमध्ये आहे.मनसेला कुठे आहे स्थान?२००९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा मतदारसंघांतून मनसेनेतिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र मनसेचा दारुण पराभव झाला होता. परंतु, आता पुन्हा मनसेचे इंजीन सुसाट निघाले आहे.आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची काय रणनीती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून असून ठाण्यातून काही दुरावलेले पदाधिकारीही स्वगृही परतण्याचा दावा मनसेच्या नेत्यांनी केला आहे.आघाडी करणार?राज यांनी अद्याप काँग्रेस आघाडीत जाण्यासंबंधी कोणताही निर्णय अथवा संकेत दिले नसले, तरी आघाडीसोबत मनसे जाण्याची शक्यताही व्यक्त होत असल्याने मनसेच्या इच्छुकांचे आघाडीच्या नेत्यांशी सूत जुळू लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे आतापासूनच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे