शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सरकारचे चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे - मुख्यमंत्री ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2020 4:07 AM

सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई : माझ्या सरकारला तीन चाके आहेत अशी टीका केली गेली, मात्र चौथे चाक जनतेच्या विश्वासाचे होते, हे विरोधकांना दिसलेच नाही, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्र घाबरला नाही व घाबरणार नाही असे सांगतानाच जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हे सरकार पाडण्यासाठी अनेक आमिषे दिली गेली मात्र हे सरकार पडले नाही आणि पडणारही नाही. अनेक अडचणी आल्या, मात्र आपण त्यातून मार्ग काढला, दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा करणारा एकही निर्णय वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने घेतला नाही, असे सांगून अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे, त्यांनी ती तातडीने जाहीर करावी अशी विनंती करतो असे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमावर काम करीत असून, चक्रीवादळ कोरोना याकाळात नागरिकांना विविध उपाययोजनांनी दिलासा देण्याचं काम केलं आहे.  यावेळी राज्य शासनाने वर्षभरात शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी आदी घटकांसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी बनवलेल्या ''महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही'' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री देसाई यांनी प्रास्ताविक केले.

सरकारला धोका नाही सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी ठामपणे हे सरकार चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या सरकारला कसलाही धोका नाही. गेल्यावर्षी शिवतीर्थावर झालेला शपथविधी सोहळा ऐतिहासिक क्षण असल्याचा उल्लेख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे