शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
2
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
3
"उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
4
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
5
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
7
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
8
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
9
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
10
अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
11
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
12
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
13
Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील!
14
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही
15
Sukesh Chandrashekar : "४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
16
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
17
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
18
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
19
Diwali 2024: दिवाळीत घरच नाही तर अंगण-उंबरठाही स्वच्छ ठेवा; तेच असते लक्ष्मीचे प्रवेशद्वार!
20
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली

नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 1:41 PM

Sandeep Naik Latest News: बेलापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी भाजपाकडे करण्यात आली होती. पण, भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी उमेदवारी दिल्याने संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

Sandeep Naik Joins Sharad Pawar's NCP: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर भाजपाला नवी मुंबईत पहिला धक्का बसला. बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तयारी करत असलेल्या पण, तिकीट नाकारण्यात आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपाला रामराम केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थिती संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. 

माजी मंत्री आणि ऐरोलीचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र आणि माजी आमदार संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, संदीप नाईक यांना मात देत मंदा म्हात्रे यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळण्यात यश मिळवले. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. 

संदीप नाईक यांच्यासह २५ माजी नगरसेवक आणि भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

संदीप नाईक यांचा पक्षप्रवेश होण्यापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते बेलापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी सुप्रिया सुळेंचीही भेट घेतली होती. पण, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वेच अॅण्ड वॉचची भूमिका घेतली होती. त्याचवेळी संदीप नाईकांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, तर ते शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. 

२०१९ मध्ये का सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेस?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर बोलताना संदीप नाईक म्हणाले, "२०१९ मध्ये काही परिस्थिती निर्माण झाली आणि निर्णय आम्हाला घ्यावा लागला. तो निर्णय नवी मुंबईच्या विकासासाठी होता. नवी मुंबईचे दीर्घ प्रलंबित विषय सत्तेत असल्याशिवाय होत नाही म्हणून तो निर्णय घ्यावा लागला. पण, आम्हाला दिलेला शब्द निवडणुका घोषित झाल्यानंतर फिरवला गेला. माझी काही अंशी कोंडी झाली. तरीही कार्यकर्त्यांची, शहराची कोंडी होऊ नये म्हणून मी थांबलो."

मंदा म्हात्रेंवर संदीप नाईकांनी साधला निशाणा!

"२०१९ मध्ये त्या पक्षाने (भाजपा) आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली. दोन्ही मतदारसंघात यश मिळालं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी, हे यश कुणाचं नाहीये. हे यश तुमचं (नाईक गट) तर नक्कीच नाहीये, हे यश पक्षाचं पण नाहीये, हे यश माझं (मंदा म्हात्रे) आहे. हे ऐकून कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आम्हाला अपमानित केलं गेलं. तो अपमान माझ्यासहित कार्यकर्त्यांनी सहन केला", असे म्हणत संदीप नाईकांनी मंदा म्हात्रेंवर नाव न घेता निशाणा साधला.   2019 मध्ये काय घडलं होतं?

गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश करतानाच संदीप नाईकांना बेलापुरमधून उमेदवारी देण्याची मागणी केली होती. पण, भाजपाने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली होती. मंदा म्हात्रे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ८७ हजार ८५८ मते मिळाली होती. तर एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक गावडे यांना ४४ हजार २६१ मते मिळाली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गजानन काळे यांना २७ हजार ६१८ मते मिळाली होती. मंदा म्हात्रे यांनी ४३ हजार ५९७ मताधिक्याने विजय मिळवला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024belapur-acबेलापूरManda Mhatreमंदा म्हात्रेNCPराष्ट्रवादी काँग्रेस