शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:16 PM

Shrikant Pangarkar Shiv Sena: पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर याने जालना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Shrikant Pangarkar: २०१७ मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर यांच्या उपस्थितीत पांगारकरने प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

श्रीकांत पांगारकर हे माजी शिवसैनिक आहेत आणि ते परत पक्षात आले आहेत. त्यांची जालना विधानसभा मतदारसंघ प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", माजी मंत्री आणि शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जून खोतकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

गौरी लंकेश हत्या प्रकरण : श्रीकांत पांगारकरची भूमिका काय?

५ सप्टेंबर २०१७ रोजी पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर ही घटना घडली. या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळेची एसआयटीने चौकशी केली. त्यात महाराष्ट्रातील व्यक्तीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यास सांगितल्याचे त्याने सांगितले. 

तपासातून समोर आले की, गौरी लंकेश यांची हत्या होण्यापूर्वी आणि नंतर श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता. या प्रकरणात पांगारकरला अटक करण्यात आली. २०१८ मध्ये श्रीकांत पांगारकरला अटक करण्यात आली होती. यावर्षी ४ सप्टेंबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने पांगारकरला जामीन मंजूर केला. 

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातही श्रीकांत पांगारकरचा सहभाग होता. याचवर्षी ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पांगारकर आणि इतर चार सहआरोपींना जामीन मंजूर केला होता. पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलवर हल्ला करण्याचा कट आणि त्यासाठी शस्त्रसाठा केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. 

श्रीकांत पांगारकर माजी नगरसेवक  

आरोपी श्रीकांत पांगारकर जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवकही राहिलेला आहे. २००१ ते २००६ या काळात तो नगरसेवक होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकjalna-acजालनाShiv SenaशिवसेनाGauri Lankeshगौरी लंकेश