आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 05:19 PM2021-06-14T17:19:22+5:302021-06-14T17:19:28+5:30

Vanchin Bahujan Aghadi : आघाडीसाठी काॅंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्व मान्यता देत नाही हा इतिहास आहे.

Get Delhi's permission first, then talk for alliance | आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

आधी दिल्लीची परवानगी घ्या मग आघाडीचे बाेला; नाना पटाेलेंना 'वंचित'चा सल्ला

googlenewsNext

अकाेला : काॅंग्रेस व वंचित बहूजन आघाडी या दाेन पक्षामध्ये आघाडी करण्याबाबतच्या अनेक चर्चा माध्यमांमध्ये हाेत असतात काॅंग्रेसचे नेते आघाडीबाबत वक्तव्यही करतात मात्र आघाडीसाठी काॅंग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला केंद्रीय नेतृत्व मान्यता देत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी आधी दिल्लीची परवानगी घ्यावी नंतरच वंचित साेबत आघाडीची चर्चा करावी असा सल्ला वंचित बहूजन आघाडीचे उपाध्यक्ष डाॅ. धैयवर्धन पुंडकर यांनी पटाेले यांना दिला आहे. ते साेमवारी पत्रकार परिषदेत बाेलत हाेते.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी अकाेला दाैऱ्याच्या वेळी वंचित बहूजन आघाडीसाेबत आम्ही निवडणूकपूर्व आघाडीबाबत चर्चेस तयार असल्याचे वक्तव्य केले हाेते या पृष्ठभूमीवर डाॅ. पुंडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना साेबत घेऊन निवडणुक लढविण्याबाबत यापूर्वी काॅंग्रेसच्या नेत्यांनी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना केंद्रातून प्रतिसाद मिळालेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री अशाेक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण या दाेन्ही नेत्यांनी वंचित साेबत आघाडीबाबत प्रस्ताव ठेवला हाेता. आम्ही सकारात्मकच हाेताे मात्र राज्यातील काॅंग्रेसच्या नेत्यांच्या प्रस्तावांला केंद्रीय नेत्यांनी कधीच मान्यता दिली नाही आताही पटाेले आघाडीबाबत बाेलत असतील तर पुन्हा मागच्या प्रमाणेच इतिहास उगाळला जाऊ नये म्हणून त्यांनी सावध हाेऊन आधी दिल्लीची परवानगी घ्यावी . पटाेले आघाडीबाबत खराेखरच सकारात्मक असतील तर त्यांनी पूर्व परवानगी घेऊन तसा प्रस्ताव ॲड. आंबेडकर यांच्याकडे द्यावा असाही सल्ला डाॅ. पुंडकर यांनी दिला आहे. यावेळी वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे, प्रदीप वानखडे, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, राजेंद्र पाताेंडे, अरूंधती सिरसाट, शाेभा शेळके आदी उपस्थित हाेते.

Web Title: Get Delhi's permission first, then talk for alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.