- शीलेश शर्मानवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलामनबी आझाद यांना मंगळवारी निवृत्तीचा निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भलेही भावुक झाले तरी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना आझाद पुन्हा राज्यसभेत असावेत, असे वाटते. उच्चपदस्थ सूत्रांनुसार एप्रिलमध्ये आझाद राज्यसभेत परत येतील व तोपर्यंत काँग्रेस नवा विरोधी पक्ष नेता करणार नाही. आझाद राज्यसभेत परत आल्यानंतर ते विरोधी पक्ष नेता असतील.१०, जनपथच्या निकट सूत्रांनुसार सोमवारी आझाद सोनिया गांधी यांना भेटायला गेले तेव्हा आझाद यांची राज्यसभेच्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जेव्हा आझाद यांनी काश्मीरमधूनच सभागृहात येण्याचा विषय काढला तेव्हा तेव्हा त्यांना मध्येच थांबवत सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘काश्मीर नाही केरळमधून परत याल.’२१ एप्रिल रोजी केरळच्या तीन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात आययूएमएलचे अब्दुल वहाब, माकपचे के.के. रागेश आणि काँग्रेसचे वायलार रवि यांचा समावेश आहे. पक्ष सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी वायलार रवि यांच्या जागी आझाद यांना संधी देऊ इच्छितात. जर आययूएमएलशी बोलणी सकारात्मक झाली तर वायलार रवि यांच्या नावावर विचार होऊ शकतो. रवि यांना राज्याच्या राजकारणात सक्रिय करण्याचेही संकेत आहेत.
मोदी ज्यांना निरोप देताना भावुक झाले, 'ते' आझाद पुन्हा येणार? सभागृहात दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 5:26 AM