शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:37 PM

Girish Bapat criticized on Sharad Pawar : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे.

परमबीर सिंग यांनी पत्रात नमूद केल्यानुसार फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हवाच काढून टाकली आहे. यावरून आता भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Girish Bapat criticized on Sharad Pawar; said, is not a judge to give a clean chit)

एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणे, हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे, कुंपणच शेत खायला निघाले आहे अशी परिस्थिती आहे. अनिल देशमुख यांच्या सर्व क्लिप आल्यावर सगळं सत्य पुढे येईल, असे गिरीश बापट म्हणाले. तसेच, शरद पवार हे क्लीनचिट द्यायला न्यायाधीश नाहीत. ते काँग्रेसला लिंबू टिंबू समजतात. काँग्रेसला गृहीत धरले जात नाही, याची किंमत काँग्रेसला येत्या काळात चुकवावी लागेल. शरद पवार नेहमीच सरकार खंबीर असल्याचे सांगतात, मात्र ते या प्रकरणातून कळतंय किती खंबीर आहेत, असा टोलाही गिरीश बापट यांनी यावेळी शरद पवारांना लगावला आहे.

पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार?मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या टार्गेटच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठा खुलासा केला आहे. शरद पवार यांनी यावेळी अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते क्वारंटाइन असल्याची कागदपत्रंच पत्रकार परिषदेत सादर केली.

"अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. १५ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात खूप फरक आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती हे सिद्ध झाले आहे", असे शरद पवार म्हणाले. 

वाझे-देशमुख भेटीची चर्चाच खोटीअनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कोरोनामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर ते क्वारंटाइन होते. त्यामुळे या काळात सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शक्यताच नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे, असे शरद पवार म्हणाले. 

अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करा - अतुल भातखळकर या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी याविरोधात समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारgirish bapatगिरीष बापटAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगPoliticsराजकारण