शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

"दुनिया घुम लो, पुणे के आगे कुछ नही!’’, कोरोना लसीवरून सुप्रिया सुळेंचा मोदींना टोला

By बाळकृष्ण परब | Published: November 28, 2020 8:06 PM

Supriya Sule News : आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे.

ठळक मुद्देलाखो कोटींच्या गप्पा मारणारे आज पुण्यात आहेतअखेरीस पु्ण्यामध्येच या कोरोनावरील लस तयार होत आहेही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल की, मीच शोधली आहे म्हणून

पुणे - कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लस मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनावरील लसीचे उत्पादन करत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसह अहमदाबाद आणि हैदराबादमधील संशोधन संस्थांचा दौरा केला. दरम्यान, आजच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लाखो कोटींच्या गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. अखेरीस पु्ण्यामध्येच या कोरोनावरील लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल की, मीच शोधली आहे म्हणून, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी याआधीही पुणे दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर महत्त्वपूर्ण काम होत आहे आणि ते पाहण्यासाठी पंतप्रधान येत आहेत यापेक्षा आपल्या सरकारचं मोठं यश काय असू शकतं, असे विधान त्यांनी केले होते.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दुपारी ४.४५ वाजता 'कोव्हीशिल्ड' या कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या 'सिरम' इन्स्टिट्यूटला भेट दिली. या भेटीत मोदी यांनी कोरोना लसची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या सव्वा तासांच्या भेटीनंतर मोदी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळाकडे निघाले.मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संपूर्ण देशाचे लक्ष हे आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेकडे लागलेले होते. या पत्रकार परिषदेत पुनावाला यांनी कोरोनावरची लस सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध होणार असून ती तिचे वितरण प्रथम भारतात केले जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. सिरमचे आदर पुनावाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. पूनावाला म्हणाले,पंतप्रधान मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात केली आहे.त्यांना कोव्हीशिल्ड लसेच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. लसेच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत पंतप्रधान समाधानी आहे. कोरोनावरील कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे.लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी तयारी केली जात आहे. जुलै 2021 ते 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध केले जाणार आहे. लसीची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि ती सर्वांना उपलब्ध करून दिली जाणार आहे असेही पूनावाला यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या