पणजी : गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने जिंकल्या आहेत. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र भाजपने अन्य पक्षांच्या मदतीने येथे सरकार स्थापन केले. यावेळी भाजपने आपल्या दोन्ही विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागलेली दिसून आली. उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या विरोधात कॉँग्रेसचे गिरीश चोडणकर आणि आपचे प्रदीप पाडगावकर हे रिंगणात आहेत. दक्षिण गोव्यामधून भाजपचे खासदार नरेंद्र सावईकर यांना कॉँग्रेसचे फ्रान्सिस्को सारडिन्हा आणि आपचे एल्व्हीस गोमेज यांनी आव्हान दिले आहे.या वेळी वेगळे काय?माजी मुख्यमंत्री आणि गोव्यातील लोकप्रिय नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे येथे सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करू शकणारे नेतृत्व भाजपकडे नाही. कॉँग्रेसला ख्रिश्चन मतदारांची कितपत साथ मिळते तसेच रा. स्व संघ भाजपला किती पाठबळ मिळवून देतो, यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.
गोवा: भाजपला करावी लागतेय प्रचंड मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:46 AM