Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 10:00 AM2021-03-22T10:00:06+5:302021-03-22T10:15:37+5:30

Goa Municipal Election, Panaji Municipal Election: या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. नावेली जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही आजच होणार आहे. 

Goa Municipal Election 2021: BJP's takes lead in Panaji; Panajikar group is better than Congress | Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर

Goa Municipal Election 2021: पणजीत भाजपाची जोरदार मुसंडी; आम्ही पणजीकर गटाकडून कडवी टक्कर

Next

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच गोव्याची राजधानी असलेल्या पणजी महानगरपालिकेमध्ये निवडणूक (Goa Municipal Election) झाली. पणजी महापालिकेसह 17 ग्रामपंचायती, 6 नगरपालिकांसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली. निकालाचा पहिला कल हाती आला असून भाजपा पुरस्कृत गटाने मोठी आघाडी घेतली आहे. (BJP Panel lead in Goa Municipal Election 2021.)


भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर आम्ही पणजीकर गटाने 4 जागांवर आघाडी घेतली आहे. कुंकळी पालिकेत 13 प्रभागांपैकी 11 प्रभागांचे निकाल जाहीर 5 काँग्रेस समर्थक, 4 भाजप समर्थक तर 2 अपक्ष उमेदवार विजयी. प्रभाग 4 मधून काँग्रेसचे समर्थन मिळालेल्या रुपा गावकर केवळ 1 मताने विजयी. आमदार समर्थक उमेदवार जॉर्जिना गामा यांचा प्रभाग 1 मधून पराभव. उपनगराध्यक्ष वीरेंद्र देसाई विजयी झाले आहेत.

या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. नावेली जिल्हा पंचायत तसेच ग्रामपंचायतीच्या १८ प्रभागांची मतमोजणीही आजच होणार आहे. 

१० वाजेपर्यंत निकाल
महापालिकेचे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे घेण्यात आले आहे. मतमोजणी येथील फार्मसी कॉलेजमध्ये होणार असून, तीसही प्रभागांचे निकाल केवळ दोन तासांतच १० वाजेपर्यंत अपेक्षित आहेत. डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडें- काकोडा, काणकोण व कुंकळ्ळी नगरपालिकांचे मतदान मतपत्रिकांद्वारे घेतले आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास थोडा विलंब लागेल.


याकडे लक्ष असेल
कुडचडें पालिकेत ८०.२४ टक्के मतदान झालेले आहे. मंत्री नीलेश काब्राल यांची तेथे कसोटी लागणार आहे. भाजप पेंनल सत्ता प्रस्थापित करील का, याबाबत उत्कठा आहे.

डिचोली पालिकेत ८७.९६ टक्के मतदान झालेले आहे. सभापती राजेश पाटणेकर यांची तेथे कसोटी लागणार आहे.

- कुंकळी पालिकेत ८०.२४ टक्के मतदान झाले असून, तेथे आमदार क्लाफासियो डायस यांचा प्रभाव टिकतो की त्यांना दणका बसतो, हे आजच्या निकालाने स्पष्ट होईल.

- काणकोण पालिकेमध्ये ८७.७ टक्के मतदान झालेले आहे. आमदार इजिदोर फाडिस तेथे तळ ठोकून होते. या पालिकेच्या निकालाबाबतही उत्सुकता आहे.

Web Title: Goa Municipal Election 2021: BJP's takes lead in Panaji; Panajikar group is better than Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.