शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

"योगी आदित्यनाथ अडीच तास आरती करणारे संन्यासी, त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 11:56 AM

ravi kishan : गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला (UP Assembly Elections) अजून काही महिने शिल्लक आहेत, मात्र यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले धोरण आखण्यात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात सत्तेत असलेली भाजपा 'मिशन २०२२' साठी सतत मंथन करीत आहे, तर समाजवादी पक्षही विजयाच्या रणनीतीअंतर्गत युती करण्याचा प्रयत्न करीत आहे. याचबरोबर, बसपा सुप्रिमो मायावती यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि योगी आदित्यनाथ यांच्यात शाब्दीक लढाई रंगत आहे.

योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचे असदुद्दीन औवेसी  (AIMIM Chief Asaduddin Owaisi यांनी म्हटले आहे. तर, योगी आदित्यनाथ यांनी असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. तसेच, भाजपा 300 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवणार असल्याचा दावा, योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. दरम्यान, गोरखपूरचे भाजपा खासदार रवी किशन  (BJP MP Ravi Kishan)  यांनीही असदुद्दीन औवेसींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानानंतर भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपाचे खासदार रवी किशन म्हणाले की, 'मी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना जाहीरपणे आव्हान देतो, आव्हान स्वीकारले आहे? महाराजजींना (योदी आदित्यनाथ) स्पर्श करून दाखवा, तुम्ही हैदराबादला पळून जाल.' याचबरोबर, भाजपाचे खासदार रवी किशन यांनी सहजनवा येथील कार्यक्रमात सांगितले की, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ब्रह्मचर्यचे पालन करणारे आहेत आणि दररोज अडीच तास आरती करणारे संन्यासी आहेत. असदुद्दीन ओवैसी तुम्ही त्यांच्या तेजाने नष्ट व्हाल.'

आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही - असदुद्दीन ओवैसीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते असल्याचे वक्तव्य करत त्यांनी दिलेले आव्हान स्वीकारले आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. "असदुद्दीन ओवैसी हे मोठे नेते आहेत आणि ते देशात प्रचारही करतात. त्यांना एका विशेष समाजाचे समर्थनही आहे. परंतु ते उत्तर प्रदेशात भाजपला आव्हान देऊ शकत नाही. भाजप आपली मूल्ये आणि मुद्दे घेऊन निवडणुकांच्या मैदानात असेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकार करतो," असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. 

300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल - योगी आदित्यनाथपुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. त्यातच, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 403 पैकी 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये भाजपाने 75 पैकी 67 जागांवर विजय मिळवला आहे. त्याबद्दल भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करताना, योगींनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRavi Kishanरवी किशनBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश