शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही! राऊतांचा सूर बदलला; राज्य सरकारला दिला 'मोलाचा' सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 9:30 AM

shiv sena mp sanjay raut after param bir singh letter bomb: माझ्या ट्विटचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल; संजय राऊत यांचं सूचक विधान

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यात खळबळ माजली आहे. देशमुख यांनी सचिन वाझेंना (Sachin Vaze) दर महिन्याला १०० कोटी गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा सनसनाटी आरोप करणारं पत्र सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) लिहिलं आहे. यामुळे देशमुख अडचणीत आले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ...तर आदरणीय शरद पवारांना जाब विचारायला हवा; काँग्रेस नेत्याचा थेट हल्लाबोलअनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनादेखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. 'अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते."आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"राज्यातील सरकारला दीड वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारमधील घटकानं आत्मपरिक्षण करावं. आपले पाय जमिनीवर आहेत की नाही ते तपासून पाहावं, असा सल्ला संजय राऊत यांनी सरकारला दिला. या घटनेमुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत. यासंदर्भात अनेकदा मी सामनामधून लिहित असतो. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं सूचक विधान राऊत यांनी केलं. मी काही या सरकारचा घटक नाही. पण हे सरकार आणण्यासाठी मीदेखील थोडे प्रयत्न केले आहेत. मात्र मी सरकारच्या चहाचा ओशाळा नाही, असं राऊत म्हणाले.मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्यासंजय राऊत यांनी थोड्या वेळापूर्वी एक शायरी ट्विट केली आहे. 'हमको तो तलाश बस नये रास्तों की है, हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है...' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. याबद्दल विचारलं असता, त्याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असा प्रश्न विचारला असता, विरोधकांच्या मागणीवर सरकार चालत नाही. विरोधी पक्षाच्या मागणीमुळे सरकारमध्ये उलथापालथ होत नाही, असं राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगsachin Vazeसचिन वाझे