मुंबई - कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आज राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांनी या पत्रामधून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार
By बाळकृष्ण परब | Published: October 13, 2020 7:46 PM
Sharad Pawar News : राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रामधून हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत.
ठळक मुद्देराज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखीशरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत केली तक्रार