शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

ग्रामपंचायती 60! राष्ट्रवादी 40, भाजपाचा 38 वर दावा; इंदापुरवर वर्चस्व कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 7:33 PM

Indapur Gram Panchayat Politics : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर  ६० ग्रामपंचायतींमध्ये  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळे दावे करीत वर्चस्वाचा दावा केला होता. याविषयी तालुक्यात चर्चा होती.

- सतीश सांगळे कळस : इंदापूर तालुक्यात पार पडलेल्या ६० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत  राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाच्या वतीने वर्चस्वाचा दावा करण्यात आला आहे. ग्रामपंचायतींवरील वर्चस्वाच्या दाव्यांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस—भाजप आमनेसामने आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ४० ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. तर भाजपने ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतीवर सरपंच नेमका कोणत्या पक्षाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस हा कलगीतुरा रंगणार आहे. (Who is king in Indapur Taluka Gram panchayat Election.)

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर  ६० ग्रामपंचायतींमध्ये  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांनी वेगवेगळे दावे करीत वर्चस्वाचा दावा केला होता. याविषयी तालुक्यात चर्चा होती. दोन दिवसात ६० ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या निवडी झाल्या. त्यामध्ये एकूण कोणाचे किती सरपंच याविषयी चर्चा  सुरु झाली आहे.

भाजपच्या थापा! इंदापूर तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता; दत्तात्रय भरणेंचा दावा

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ४० ग्रामपंचायतीवर यश मिळाल्याचा दावा केला आहे. २ ग्रामपंचायतीत संमिश्र यश असल्याचे सांगितले. याबाबत मंत्री भरणे यांनी एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.  तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलेल्या यादीमध्ये सपकळवाडी, अकोले, पोंधवडी, लोणी देवकर, चिखली, निमगाव केतकी, निंबोडी, अंथुर्णे, रुई, बळपुडी, भांडगाव, हगारेवाडी, काटी, कळस, तरंगवाडी, तक्रारवाडी, नरसिंगपूर, लासुर्णे, शेटफळगडे, पिंपरी बुद्रुक, शहा, निमसाखर, सणसर, गोतोंडी, सराफवाडी, चांडगाव, व्याहळी, कुंभारगाव, कळंब, पिंपळे, भरणेवाडी, चाकाटी, गिरवी, कडबनवाडी, पळसदेव, घोरपडवाडी, कचरवाडी (निमगाव केतकी), सरडेवाडी, कौठळी, जाचक वस्ती, जाधववाडी, भोडणी या गावांचा समावेश आहे.

भाजपच्या वतीने  चांडगाव, लोणी देवकर, बळपुडी, भावडी, अकोले, शेटफळगढे, पिंपळे, निरगुडे, भिगवण, कुंभारगाव, भादलवाडी, निरवांगी, दगडवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, व्याहळी, वरकुटे खुर्द, हगारवाडी, गोतंडी, निमसाखर, वालचंदनगर, कळंब, सरडेवाडी, गलांडवाडी नं. १, गलांडवाडी नं. २, बाभुळगाव, गोंदी, भांडगाव, नृसिंहपूर, टणू,भोडणी, कचरवाडी (बावडा), पिठेवाडी, निंबोडी, तावशी, जाधववाडी, रेडा, कचरवाडी (निमगाव) या ग्रामपंचायतीवर दावा करण्यात आला आहे.

तालुक्यात कोणी काही दावा केला तरी ४० ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे २ ग्रामपंचायतीत संमिश्र यश आहे. ग्रामपंचायतीचा विकास आराखडा बनवून विकासाला प्राधान्य दिले जाईल. विकासकामासाठी निधी कमी पडु देणार नाही.- दतात्रय भरणे, राज्यमंत्री

 

तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत तसेच सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये बहुमताने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. या निवडीत भाजपचे सर्वाधिक ३८ सरपंच व उपसरपंच झाले आहेत. तालुक्यातील जनतेने  सत्ताधाºयांच्या विरोधात स्पष्ट विरोधी कौल दिला आहे.- हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री

टॅग्स :harshvardhan patilहर्षवर्धन पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाIndapurइंदापूर