Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 06:41 PM2021-01-19T18:41:56+5:302021-01-19T18:52:38+5:30

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे

Gram Panchayat Election Results: We are 'Number One'; BJP claims to have won 5,781 gram panchayats | Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

Next

मुंबई – राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं, कट्टर विरोधक एकमेकांचे मित्र बनल्याने राज्यात होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं, यातच १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यांचा निकालही लागला. यात आम्हीच नंबर १ असल्याचा दावा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष भाजपा दोघंही करत आहेत.

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे. जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची झोप उडाली आहे असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे. निकालाच्या दिवशीच भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यभरात भाजपा ६ हजार ग्रामपंचायती जिंकणार असा दावा केला होता. भाजपाने ग्रामपंचायत निवडणूक निकालाची संपूर्ण यादीच प्रसिद्ध केली आहे. यात कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती भाजपानं जिंकल्या आहेत त्याची आकडेवारी दिली आहे. 

 

भाजपानं जिंकलेल्या ग्राम पंचायती
अनु, क्रमांक जिल्हाएकूण ग्रामपंचायती जिंकलेल्या ग्रामपंचायती 
सिंधुदुर्ग ७०४५
२ रत्नागिरी ४७९५९
रायगड ८८३३
ठाणे ग्रामीण१५११०५
पालघर (वसई)
नंदूरबार८७२७
धुळे२१८११७
नाशिक६२११६८
जळगाव७८३३७२
१० अहमदनगर७६७३८०
११ बुलढाणा५२७२४९
१२अकोला२२५१२३
१३वाशिम१६३८३
१४अमरावती५५३१९१
१५यवतमाळ९८०४१९
१६वर्धा५०२८
१७नागपूर१३०७३
१८भंडारा १४८९१
१९गोंदिया१८९१०६
२०गडचिरोली३६२निकाल प्रतिक्षेत
२१चंद्रपूर६२९३४४
२२नांदेड१०१५४४२
२३परभणी५६६२२९
२४हिंगोली४९५१९१
२५जालना४७५२५३
२६औरंगाबाद६१८२०८
२७बीड१२९६७
२८लातूर३८३२११
२९उस्मानाबाद४२८१८०
३०पुणे७४८२००
३१सोलापूर६५८२०४
३२सातारा८७९३३७
३३कोल्हापूर४३३१८९
३४सांगली १५२५७
 एकूण ग्रामपंचायत १४२०२५७८१

 

Web Title: Gram Panchayat Election Results: We are 'Number One'; BJP claims to have won 5,781 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.