- महेश खरेअहमदाबाद : पाटीदार व कोळी समाज यांची मोठी लोकसंख्या असलेल्या अमरेली मतदारसंघांत यंदा बसपाचे उमेदवार रावजीभाई चौहान यांच्यामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. मात्र सामना भाजप व काँग्रेसमध्येच होईल, असा अंदाज आहे. भाजपचे खासदार नारणभाई काछडिया यांना काँग्रेसचे परेश धानानी यांचा यंदा मुकाबला करणार आहेत.नारणभाई काछडिया पाटीदार समाजाचे असले तरी एका सरकारी डॉक्टरला केलेल्या मारहाणप्रकरणी त्यांना तीन वर्षांची तुरुंगवास व ३५ हजार रुपये दंड ठोठावल्याने ते वादात सापडले. त्या निकालाला स्थगिती मिळाल्याने ते रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधातील परेश धानानी अमरेलीहून तीनदा आमदार झाले आहेत. ते प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकांत अर्जुन मोढवाडिया व शक्तिसिंह गोहील यांच्या पराभवानंतर तर धानानी यांचे पक्षातील स्थानही अधिक बळकट झाले आहे. ते राहुल गांधी यांच्याही जवळ गेले आहेत.सौराष्ट्रातील हा मतदारसंघ यंदा भारतीय जनता पक्ष व काँग्रेस दोघांसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी अमरेलीमध्ये सभा घेतल्या. मोदी तर इथे दोनदा आले. त्यामुळे या मतदारसंघाचे महत्त्व लक्षात यावे.काँग्रेसने इथे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा उपयोग करून घ्यायचे ठरविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत इथे भाजपला चांगले यश मिळाले नव्हते, कारण पाटीदार समाजाची नाराजी. पण आता तशीच स्थिती आहे का, हे समजणे अवघड आहे. शिवाय कोळी समाजातील मोठे नेते भाजपसमवेत आहेत. त्यामुळे लढाई चुरशीचीहोणार आहे.>चार लाख पाटीदार, तीन लाख कोळीसमुद्राला लागून असलेल्या अमरेलीत हिऱ्यांचा उद्योग तर मोठा आहेच, पण मोठे सिमेंट कारखानेही याच भागात आहेत शिवाय अमरेली हे महत्त्वाचे बंदरही आहे.या मतदारसंघामध्ये पाटीदार मतदार ४ लाखांच्या जवळपास असून, ३ लाख १२ हजार कोळी मतदार आहेत. याशिवाय ९२ हजार दलित, ९0 हजार अहिर व १ लाख १२ हजारांच्या आसपास अल्पसंख्याक आहेत.
गुजरातच्या अमरेलीमध्ये तिरंगी लढत; मात्र सामना भाजप खासदार व काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यामध्येच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 3:51 AM