हमीरपूर – उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात भाजपा नेत्याने स्वत:च्या वृद्ध आईला घराच्या बाहेर काढलं आहे. त्यानंतर ही आई वृदांवन येथे भटकत होती. जेव्हा याबाबत एका स्थानिक वृत्तवाहिनीला समजलं असता त्यांनी या हतबल आईची कहाणी जगासमोर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपा नेत्याची आई अचानक टीव्ही आली आणि तिने जे काही सांगितले ते ऐकून सगळ्यांना धक्का बसला.
माहितीनुसार, वृद्ध महिलेच्या मुलाचं नाव प्रमोद अग्रवाल असं आहे. तो भाजपा मंडल अध्यक्ष आहे. या वृद्ध आईला ३ भाऊ आहेत आणि ते संपत्तीनंही समृद्ध आहे. तरीही तिघांनीही या वृद्ध आईला घरात ठेऊन तिचा सांभाळ करणं योग्य मानलं नाही. त्यामुळे सध्या वृद्ध आई वृदांवनमध्ये दारोदारी भटकत आहे. ज्यावेळी वृद्ध आई परिसरात भटकत होती तेव्हा एका पत्रकाराने तिला पाहिलं. त्याने त्या महिलेची विचारपूस केली. त्यानंतर त्याला जे समजलं त्याने तो चक्रावला.
भाजपा नेत्याच्या आईनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराच्या वेदना ऐकवल्या आणि सगळ्यांना संताप आला. स्थानिक वृत्तवाहिनीने ही वृद्ध आई कशारितीने वृदांवनच्या वृद्धाश्रमात भटकत होती त्याची कहाणी सांगितली. त्यांनी सांगितले की, या वृद्ध आईला ३ मुलं आहेत. या मुलांनी तिला फक्त घराबाहेर काढलं नाही तर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. आता ही वृद्ध आई दारोदारी खाण्यासाठी भीक मागत असल्याचं विदारक चित्र समोर आलं. कोणीतरी या महिलेचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर ही महिला हमीरपूरच्या मंडल भाजपा अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांची आई असल्याचं उघड झालं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनीही भाजपावर आगपाखड करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियात प्रमोद अग्रवाल यांच्याविरोधात युजर्सने संताप व्यक्त केला. सगळीकडून टीका होऊ लागल्यानंतर प्रमोद अग्रवाल यांनी या प्रकरणाशी हात झटकला आहे. या प्रकरणी ते म्हणाले की, ही महिला माझी आई आहे हे खरं आहे परंतु ती माझ्या बहिणीच्या घरी राहत होती. तिच्यासोबत असं का घडलं? याबाबत मला काहीच माहिती नाही असा दावा प्रमोद अग्रवाल यांनी केला.