2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 05:14 PM2019-03-29T17:14:12+5:302019-03-29T17:39:08+5:30

लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही.

Hardik Patel can't contest, Guj HC rejects his plea | 2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

2019ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलला लढता येणार नाही, न्यायालयाचा मोठा झटका

Next

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. त्यातच आता काँग्रेसमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेल यांना निवडणूक लढवता येणार नाही. गुजरात न्यायालयानं त्यांना निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. गुजरात न्यायालयात त्यांना दोन वर्षांची मिळालेल्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयानं ती याचिकाच फेटाळून लावली आहे. 2015मध्ये मेहसाणातल्या भाजपा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाच्या नियमानुसार ज्याला दोन वर्षांची शिक्षा झाली तो निवडणूक लढवू शकत नाही. 

गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली होती.


परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना आता निवडणूक लढवता येणार नाही. हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते.

Web Title: Hardik Patel can't contest, Guj HC rejects his plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.