शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल; 11वी तील आदित्यनं उडवला राजकीय 'धुरळा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 10:29 AM

Harshvardhan Jadhav Son Aditya Jadhav Announce Panel : हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव याने मंगळवारी कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे. 

ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. याच दरम्यान हर्षवर्धन जाधवराजकारणात सक्रिय होत असून त्यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांचे सुपुत्र आदित्य जाधव याने मंगळवारी कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली आहे. 

आदित्य जाधव याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि त्यांची आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचे पॅनल उभे केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढीही सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक झाल्यानंतर आदित्यने स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. त्याने राजकीय वाटचाल सुरू केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचं आदित्यने म्हटलं आहे. 

अकरावीत असलेल्या आदित्यने ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या काही खोचक प्रश्नांना नेत्याप्रमाणे समर्पक उत्तरंही दिली आहेत. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांना सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्य जाधवने केली आहे. तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. 

राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याचा दावा

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी जाधव यांना अटक केली आहे. जाधव यांनी आपल्याविरुद्ध राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. जाधव यांनी सांगितले की, आपण बावधन येथे दुकानात गेलो असताना माझे आणि सहकारी महिलेचे अपहरण करुन मारहाण करण्यात आली. त्याविरोधात आपण पोलिसांकडे तक्रार द्यायला गेला असताना आपली तक्रार घेण्यात आली नाही. राजकीय हेतूने आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकPoliticsराजकारण